विनापरवाना वाहतुक होत असलेले २५,९२,११४/- रुपये किंमतीचे ४१ कि. ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-सांगली शहर पोलीस ठाणे व निवडणुक पथकाची कामगीरी

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. वरीष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव, याचे मार्गदर्शनाखाली श्री संजय मोरे, पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाणेकडील
१) पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, २) पोमा ७५० महेश मुळीक, ४) पोना/७०० पोहेकॉ/७६९ अजय माने, ३) पोलीस नाईक /१९८० निशांत मागाडे, ४) धनाजी मोरे, ५) पोना/२०८२ अविनाश सागर ६) पोकों/२५७१ संदिप
नागरगोजे

निवडणुक पथकातील

१) निखील सर्जेराव म्हांगोरे, २) शंकर कुलैया भंडारी, ३) प्रमोद अर्जुन भिसे

घटनेची हकीकत-

सदर घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, आगामी लोकसभा निवडणुकी-२०२४ अनुषंगाने आदर्श
आचारसंहिता लागू असून दिनांक १२.०४.२०२४ रोजीचे १२.०० वा.चे. सुमारास सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सागलीवाडी टोलनाका येथे निवडणुक पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक /१९८० निशांत मागाडे च पोकों/२९७१ संदिप नागरगोजे हे निवडणुक पथकाचे प्रमुख निखील सर्जेराव म्हांगोर व कर्मचारी शंकर कुलैया भंडारी, ३) प्रमोद अर्जुन भिसे असे नाकाबंदी करीत असताना मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहन क्रमांक एमएच-१०-सी.ए.-८६३० मधुन इसम नामे देवेंद्र बाबूलाल माळी वय-२० वर्षे रा. शिराळकर कॉलनी आष्टा ता. वाळया जि. सांगली हे विनापरवाना चांदीचे दागीन्यांची वाहतुक करीत असताना मिळून आलेने सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण व पोलीस स्टाफने त्याठिकाणी जावून मिळुन आलेल्या वाहनाची दोन पंचांसमक्ष झडती घेवून आचारसंहिता कालावधीमध्ये विनापरवाना वाहतुक होत असलेले २५,९२,११४/- रुपये
किमतीचे ४१ कि. ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने मिळुन आलेने ते सविस्तर पंचनाम्याने जप्त केले आहेत.

वरीलप्रमाणे मिळून आलेल्या दागीन्यांबाबत मा. भारत निवडणुक आयोगाने सांगली जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीकडे तसेच मा. आयकर अधिकारी व सेवा व वस्तुकर अधिकारी सांगली यांचे कार्यालयात अहवाल अहवाल सादर करुन पुढील कारवाई करणेची तजविज ठेवली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट