सरकारी अनुदानाचे पैसे मिळवून देतो असे सांगुन महिलांची फसवणूक करून सोने लुटणारा रेकॉर्डवरील परराज्यांतील सराईत आरोपी जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-२,०२,५००/- रु. चा
मुद्देमाल हस्तगत.
अपराध क्र आणि कलम
तासगाव पोलीस ठाणे
फिर्यादी नाय
शोभाताई शिवाजी कोरटे, वय ५५ वर्षे, रा. कोरटे मळा, कौलगे, ता.
तासगाव, जि. सांगली. माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों / १८८१ सागर लवटे
गु.र.नं. १९२/२०२४ भादविर्स कलम ४२०, ४०६ प्रमाणे
गु.दा.ता वेळ
दि. ०७.०४.२०२४ रोजी दुपारी १३.३० वा चे दरम्यान
ता. ०७.०४.२०२४ रोजी २०.४० चा.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोहेकों/ सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरीबा बंडगर, अमर नरळे, पोना/ उदयसिंह माळी, संदीप नलावडे, पोशि / कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे.
अटक वेळ दिनांक
दि. ०९/०४/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
विशाल कल्लाप्पा कांबळे, वय ४५ वर्षे, रा. केईपी कॉलनी, चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगांव, राज्य
कर्नाटक.
उघडकीस आलेले गुन्हे
१. तासगाव पोलीस ठाणे गु. र. नं. १९२/२०२४ भादविर्स कलम ४२०, ४०६ प्रमाणे.
२. जत पोलीस ठाणे गु. र. नं. १६४/२०२४ भादविसं कलम ४२०, ४०६ प्रमाणे. जप्त मुद्देमाल
१. १,५२,०००/- रु. किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात कर्णफुले, डोलें, बोरमाळ असे जु.वा. किं.अं.
- २. ५००/- रु. किंमतीच्या२०० रु दराच्या २ व १०० रु दराची १ अशा एकूण ३ भारतीय चलनी नोटा.3. ३. ५०,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल जु.वा.किं.अं.
२,०२,५००/- (दोन लाख दोन हजार पाचशे रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पचार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन फसवणूक करून अपहाराचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
सांगली जिल्हयातील जत व तासगाव पोलीस ठाणे हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे / पेन्शनचे पैसे मिळवून देतो, आधार कार्ड घेवून चला असे सांगुन मोटार सायकलवर घेवून जावून त्यांचे अंगावरील सोने काढून घेवून फसवणूक केल्याचाबत गुन्हे दाखल होते.
सदर गुन्हयाचे अनुशंगाने अभिलेखावरील आरोपीची माहिती घेतली असता, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोहेकों/ सागर लवटे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा आरोपी हा शिव शंभो चौक ते कर्नाळ रोड परिसरात विना नंबरची डिस्कव्हर मोटार सायकलवरुन फिरत आहे.
मिळाले माहितीप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व त्यांचे पथकाने शिव शंभो चौक ते कर्नाळ रोड परिसरात निगराणी करीत असताना, एक इसम रोड कडेला विना नंबर प्लेटचे मोटार सायकलवर संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव विशाल कल्लाप्पा कांबळे, यय ४५ वर्षे, रा. केईपी कॉलनी, चिंचली, ता. रायचाग, जि. बेळगांव राज्य कर्नाटक असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, यरील वर्णनाचे दागिने मिळून आले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचे ताब्यात असले मोटार सायकलवरून तासगाव जवळील सावळज व जत मधील विठ्ठलनगर येथे जावून महिलांना “सरकारी अनुदानाचे पैसे आले असून त्याचे वाटप चालु आहे, ते पैसे तुम्हाला मिळवून देतो” असे सांगून त्यांचे अंगावरील सोने फसवणूक करून काढून घेतले होते, त्यातीलच हे मिळालेले सोन्याचे दागिने असल्याची कबुली दिली.
सदर घटनेचाबत तासगाव व जत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे दागिन्यांचा अपहार करून फसवणुक केल्याबाबचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले. विशाल यल्लाप्पा कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर अपहार करुन फसवणूक करणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com