मुंबईचे रक्तदाता सुरेश रेवणकर बिहार मध्ये अखंड भारतसेवा अवॉर्डने सन्मानीत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बिहार :-दैनिक अग्रलेख- मुंबई उपनगर
मुंबई चे घाटकोपर येथे राहणारे सुरेश प्रभाकर रेवणकर यांच्या रक्तदानाचे योगदान एकूण 158 वेळा रक्तदान करून शेकडो प्राण वाचवले ( जे घाटकोपर चे चालती फिरती रक्त पेढी म्हणून प्रसिद्ध आहेत )आणि निराधार सेवा केंद्र अनाथ आश्रम आणि नवजीवन आधार संस्थे चे माध्यमातून अनेक गरजू मुलांचे पालन पोषण सारखे व त्यांना शिक्षण मिळवून देण्यासाठीचे सामजिक कार्याची दखल सम्राट अशोक रक्त सेवा समिती झंझारपुर मधुबनी बिहार ह्यांनी घेतले आणि 07.04.2024 रोजी येथील देवराज इंद्र पॅलेस झंझारपुर येथे आयोजित कार्यक्रमात भारतातील प्रत्येक राज्यातून व नेपाल तसेच मुंबई तून सुरेश रेवणकर ह्यांची निवड करण्यात आले आणि त्यांना अखंड भारत सेवा सन्मान 2024 पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

मान चिन्ह आणि सन्मान पत्र देण्यात आले. आणि खास म्हणजे प्रभु रामचंद्र चे सासरी म्हणजे माता जानकी चे माहेरी म्हणजे प्रभु रामचंद्र चे सासरे राजा जनक मिथिलाचे पवित्र भूमी मध्ये मिळालेले हे पुरस्कार माझ्या आई वडील आणि हितचिंतकांना समर्पित केले असे मत त्यांनी या वेळी काढले.

त्यांना पुढील कार्यासाठी सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे हार्दिक शुभेच्छा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट