शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारा आरोपी जेरबंद…

0
WhatsApp Image 2024-04-11 at 8.40.41 AM
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-२५,८०,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत .

पोलीस स्टेशन
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

अपराध क्र आणि कलम
गु.र.नं.२१०/२०२४ भादविसं कलम १८८, ३२८, ३४ अन्न सुरक्षा आणि मानके अधि- २००६ चे कलम ५९ प्रमाणे

फिर्यादी नाव

संकेत संजय मगदुम, नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.

गु.दा.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों / १०२५ अमोल लोहार

दि. ०९.०४.२०२४ रोजी दुपारी १७.०५ वा चे दरम्यान

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा,
पोहेकों / अमोल लोहार, आमसिध्द खोत, अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, अमर नरळे, संजय कांबळे,
पोना / सोमनाथ गुंडे, पोशि/ सोमनाथ पंतगे, रोहन घस्ते, सुनिल जाधव, सुरज थोरात, कैप्टन गुंडवाडे.

अटक वेळ दिनांक दि. ०९/०४/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

मधुसुदन महेश मगदुम, वय २२ वर्षे, रा. हसनी आश्रम जवळ, श्रीरामनगर विजय नगर सांगली. जप्त मुद्देमाल

१. १०,८९,०००/- रु. किमतीचे जांभळ्या रंगांचे केशरयुक्त विमल पान मसाला असे मराठीत, कन्नड, किंग पैक, व हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुडयाची किमंत १९८ रु असे छापील कंपनी दराचे एकुण ५,५०० पुढे

२. ३,८८,९६०/- रु. किमतीचे गडद निळ्या रंगांचे केशरयुक्त विमल पान मसाला असे मराठीत, कन्नड, किंग पॅक, व हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका पुड्याची किमंत १८७ रु असे छापील कंपनी दराचे एकूण २,०८० पुढे.

३. ४९,१२०/- रु किमतीचे लालसर, निळसर, काळसर रंगांचे केशरयुक्त विमल पान मसाला असे मराठीत, कन्नड, किंग पेंक, व हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका पुडयाची किमंत १२० रु असे छापील कंपनी दराचे एकूण ४१६ पुढे.

४. १,२१,०००/- रु किंमतीचे जांभळ्या रंगांचे पुढे त्यावर व्ही टोबॅको किंग पॅक, च हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका एकाची पुडयाची किमंत २२ रु छापील कंपनी दराचे एकुण ५,५०० पुडे.

५. ६८,६४०/- रु किंमतीचे गडद निळ्या रंगांचे पुढे त्यावर व्ही टोबॅको हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका पुडयाची किमंत ३३ रु छापील कंपनी दराचे एकुण २,०८० पुढे.

६. १२,४८०/- रु किंमतीचे लालसर, निळसर, काळसर रंगांचे पुढे त्यावर व्ही टोबॅको, हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुडा, एका पुडयाची किमंत ३० रु छापील कंपनी दराचे एकुण ४१६ पुढे.

७. ८,५०,०००/- किंमतीचे महिंद्रा कंपनीचे एक पांढ-या रंगाचे बुलेरो पिकअप तिचा आर टी ओ क्र. MH 08 AP 5047 असा जु.वा.कि.अं.
२५,८०,०००/- (पंचवीस लाख पेंशी हजार रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्या लोंकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. ०७/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोहेकों / हणंमत लोहार यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, म्हैसाळ ते मिरज जाणारे रोडवरुन इसम नामे मधुसुदन मगदुम हा वाहन क्र MH 08 AP 5047 मधून बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटखा चोरुन विक्री करण्याकरीता वाहनातुन मिरज कडे घेवून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, म्हैसाळ रोड ते मिरज जाणारे रोडवर मोहन यादव यांचे ज्योतीलिंग ऊस रोप वाटीके समोर निगराणी करीत असताना, एक मंहिद्रा पिकअप वाहन क्र MH 08 AP 5047 हे म्हैसाळ ते मिरज जाणारे रोडने येताना दिसले तसा त्या वाहनाचा बातमी प्रमाणे संशय आल्याने सदर वाहनास थांबणेचा इशारा करुन ते वाहन पोलीसांनी रस्त्याचे कडेला थांबवुन त्यातील वाहन चालकास पंचा समक्ष सपोनि सिकंदर वर्धन यांनी त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्या वाहन चालकाने त्याचे नाव मधुसुदन महेश मगदुम व.व. २२ रा. हसनी आश्रम जवळ श्रीरामनगर विजय नगर सांगली असे असल्याचे सांगितले. नमुद वाहन चालकांस त्याचे कडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का? तसेच त्याचे वाहनांमध्ये कोणता माल भरला आहे? तसेच त्याची बिल पावती आहे काय याबाचत त्याचे कडे विचारणा केली असता त्याचेकडे वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे नसल्याचे सांगितले.

तसेच त्याचे ताबेत असलेल्या वाहना मध्ये कोणता माल भरला आहे त्याबाबत मधुसुदन मगदुम यास विचारण केली असता तो काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देषु लागला. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष मगदुम यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये वरील वर्णनाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधी पान मसाला सुंगधी व गुटखा मुद्देमाल मिळून आला. त्याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदर गाडी मध्ये सुगंधी पान मसाला व गुटखा मुद्देमाल असुन तो कुडची येथील प्रोप्रायटर पाटील पुर्ण नाव माहित नाही यांचे गोडावुन मधुन स्वप्नील प्रभाकर लुगडे रा. समतानगर गल्ली १४ नं. गल्ली जवळ मिरज याचे सांगणेवरुन तेथुन भरुन तो मिरज समतानगर या ठिकाणी पोहचविणेस कळविले असल्याची कबुली दिली.

लागलीच सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालातील गुटख्याचे रासायनिक तपासणीसाठी सॅम्पल घेऊन पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट