जनावरांना अमानुष वागणुक देवून अवैध कत्तल अथवा विक्री करण्याचे हेतुने बेकायदेशीररित्या वाहतुक करणारे टोळीचा पर्दाफाश…
उपसंपादक-रणजित मस्के
कराड:– कासेगांव पोलीस ठाणे
गु.र.न.व कलम
फिर्यादीनाव
गु.र.न. ६७/२०२४ महा. पशु संरक्षण अधि. १९७६ चे कलम ५.५ (ए),५ (बी),९,१० प्राण्यांचा छळ प्रति. अधि. १९६० चे कलम ११ (१) (डी), ११ (१) (एच),११ (१) (आय), ११ (१) (ए), महा. पोलीस अधि १९५१ कलम ११९, मोटर वाहने अधि. १९८८ कलम १९२(ए), केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ चे कलम १२५ (ई) प्रमाणे
सचिन जगन्नाथ पाटील पोहवा/१४२० नेम. कासेगांव पोलीस ठाणे मो.नं.९१७५८९१४२३
गु.दा.ता.वेळ
०९/०४/२०२४ रोजी ०९.२६
वाजता
माहिती कशी प्राप्त झाली
दि. ०९/०४/२०२४ रोजी सुरु रात्री ०३.०० वा. चे सुमारास मालखेड फाटा
बातमीदार
वैभव किरण जाधव प्राणी कल्याण अधिकारी रा. तासवडे ता. कराड
चेकपोस्ट येथे
जि. कराड यांचेकडून
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिप घुगे साो,मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम साो,
मा. मंगेश चव्हाण साो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो इस्लामपुर
यांचे मार्गदर्शनाखाली
स.पो.नि. भालचंद्र देशमुख, १) पो.उ.नि. राहुल वाघमारे २) पोहेकॉ/१४२० सचिन पाटील ३) पोहेकॉ/६२३संग्राम कुंभार ४) पोहेकों / १६८८ सचिन चव्हाण ५) चापोकॉ/१२७३ संभाजी पाटील
यातील आरोपी क्र. ०१ यास अटक अनुशंगाने तपास करीत आहोत, अटक वेळ दिनांक करणेत आलेली आहे. तसेच इतर आरोपी यांचेकडे गुन्ह्याचे
आरोपीचे नाव पत्ता
१) दुर्गेश शंकर जाधव (चालक) वय २३ वर्षे रा. पेठनाका ता. वाळवा जि. सांगली
२) विधीसंघर्षित बालक (क्लिनर)
३) आयशर गाडीचा मालक सचिन निवास साळुंखे
४) रामहरी तुळशीराम मुंडे वय ३८ वर्षे रा. निवडुंगवाडी जि. बीड
५) अशोक शहाजी शिरसाट वय ३२ वर्षे रा. निवडुंगवाडी जि. बीड
६) रामधन बीभिशन गोपाळघरे वय ३८ वर्षे निवडुंगवाडी जि. बीड
७) अशोक कारभारी देठे वय ३६ वर्षे निवडुंगवाडी जि. बीड
जप्त मुददेमाल
१) ३,३०,०००/- रुपये किमतीचे पांढरे रंगाचे गोवंश जातीचे एकुण ११ बैल प्रत्येकी किंमत (तीस हजार रुपये) प्रमाणे किं.अं.
२) १३,००,०००/- रु. किमतीचा चॉकलेटी रंगाचा आयशर ट्रक क्र. MH 11 CH 8909 असा असलेलो जु.वा.कि.अं.
१६,३०,०००/- रु. किंमतीचा एकुण मुद्देमाल
गुन्हयाची थोडक्यात हकीकतः वरील तारीख वेळी व ठिकाणी दि. ०९/०४/२०२४ रोजी सुरु रात्री कासेगांव पोलीस ठाणे हद्दीत मालखेड फाटा येथे नाकाबंदी करीत असताना ठाणे अंमलदार पोहवा/६२३ कुंभार यांना सांगली कंट्रोल रूम येथून कळविण्यात आले की, वैभव किरण जाधव व्यवसाय प्राणी कल्याण अधिकारी यांनी फोनवरुन कळविले की, चॉकलेटी रंगाचा आयशर ट्रक नं. MH 11 CH 8909 मध्ये जनावरांची वाहतुक होत आहे.


अशी माहिती मिळालेने त्या अनुषंगाने आंतरजिल्हा मालखेड नाका चेकपोस्ट याठिकाणी वाहनांची कसून तपासणी करत असताना वरील क्रमांकाचे वाहन मिळून आले असता त्यास थांबवून चेक केले असता त्यामध्ये साधारण ११ पांढ-या रंगाची (बैल) जातीची जनावरे अवैध्यरित्या जनावर वाहतुकीच्या परवाना तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतुक करीत असताना आढळून आले. वाहन चालक याचेकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलेने सदरची वाहतुक ही कत्तल किंवा विक्री करण्याच्या उद्देशाने व अवैध्य बेकायदा वाहतुक करीता असताना जनावरांना दाटीवाटीने गाडीमध्ये भरुन त्यांना चारापाण्याची व्यवस्था न करता क्रुरतेने वागणुक दिलेचे दिसून आले. यातील आयशर चालक वाचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नांव दुर्गेश शंकर जाधव रा. पेठनाका असे असलेचे सांगितले.
त्यावेळी आयशर ट्रक चालक याचेबाबत माहिती घेतली असता त्याचेवर यापुर्वी वडगांव पोलीस ठाणे जि. कोल्हापूर व चिपळून पोलीस ठाणे जि. रत्नागिरी येथे जनावरांची वाहतुक करणेबाबतचे गुन्हे दाखल असलेबाबत माहिती मिळालेली आहे, दरम्यान गुन्हा दाखल करतेवेळी आरोपी क्र. ०४ ते ०७ यांनी वरील जनावरे त्यांचे मालकीची असलेबाबत तोंडी सांगितले परंतु त्याबाबत कोणताही मालकीचा पुरावा अथवा अन्य कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. सबब सदर गुन्ह्यातील वरील जनावरे व मुद्देमाल सविस्तर पंचनामा करुन जप्त करणेत आलेला आहे. सदर कारवाईमध्ये ११ गोवंश जातीची बैल जनावरे व आयशर वाहन असा एकुण १६,३०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळाला असून सदरबाबत वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करणेत येवून आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करणेत आलेली असून वाहन मालकाचा शोध घेवून त्यास सदर गुन्ह्यात अटक करणेची तजवीज ठेवलेली आहे. तसेच जनावरे सुरक्षिततेच्या कारणास्तव वैद्यकीय तपासणी करुन श्री. भगवान महावीर गो पालन सामाजिक सेवाभावी संस्था कराड येथे ठेवण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. वाघमारे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com