मंडणगड मधिल अफलातून नाट्य प्रयोगाला प्रेक्षकांचा अफलातून प्रतिसाद…

संपादिका – दिप्ती भोगल
मंडणगड:-गणेश माळी लिखित दिग्दर्शित ,विनोदी नाटक अफलातूनची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे, नवीन कलाकार असूनही ,या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत, नुकतेच या नाटकाचा प्रयोग मंडणगड तालुक्यात पार पडला, व येथील रसिक प्रेक्षकांनी प्रथमच व्यवसाहिक नाटक पाहिल्याची प्रतिक्रिया दिली .





नाटकाचा प्रयोग रंगला व प्रेक्षक वर्गही खुश झाला, अधिकृत असे नाट्यगृह मंडणगड मध्ये नसतानाही अफलातूनच्या टीम ने येथे एका लग्न सभागृहा मध्ये नाटकाचा प्रयोग करायचे ठरविले व अनेक अडचणीना सामोरे जात नाटक दणक्यात पार पाडले हे कौतुकास्पद.
नटखट प्रॉडकशन्स व मुक्ता प्रॉडकशन्स ची निर्मिती असलेल्या या नाटकात मुख्य भूमिकेत गणेश माळी सोबत मंदार मुसळे, दीनेश भोईर, प्रभनंजन कुर्लेकर, प्रितम कांबळे, सुरज येळणे, दीपेश पाटील, यश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, पुनम प्रधान, निलम जोशी, सुनैना कोंडविलकर, आश्विनी कांबळे कलाकार असुन रंगभूषा/ वेशभूषा प्रदीप जाधव, नेपथ्य – वैभव माळी, सुदेश धामणे , संगीत – चैतन्य नांदगावकर, लाईट्स – प्रतिक शिंदे यांनी केले असुन निर्माते – सुशील मोरे, अभिषेक पाडेकर व सह निर्माते – सचिन वालम आहेत, कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना येथील व्यवस्थापन वैभव माळी, सुरज माळी, विधान पवार, अतुल पवार, निलेश मोरे, अस्मिन हंबीर, राजेंद्र जाधव, सिकंदर हंबीर आणि मंडळीनी छान आणि लिलया पार पाडली. सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे अफलातून टीम कडून सांगण्यात आले.
मध्यंतरांत उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार श्री. सचिन माळी यांनी केले, सदर प्रयोगाला श्री. आदेश मर्चंडे, सौं. अस्मिता केंद्रे, श्री. अनंत केंद्रे, श्री. प्रताप घोसाळकर, श्री. प्रदीप तांबे, सौ. समिधा सापटे, श्री. विनोद पवार, श्री.सुरेश दळवी,श्री. बाळकृष्ण मर्चंडे, श्री.महेश महाजन, श्री. श्रीकांत तेवरे तसेच गणेश माळी यांचे आई वडील श्री. सिताराम माळी, सौ. वैशाली माळी आदी मान्यवर उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांनी कलाकारांची, तंत्रज्ञानाची झालेली गैरसोय व मेहनत पाहता मंडणगड मध्ये लवकरच नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
प्रयोगा शेवटी गणेश माळी यांनी प्रेक्षकांचे व टीम अफलातून चे आभार मानले तसेच या नाटकाचा प्रयोग कोणाला पाहिजे असल्यास निर्मात्यांकडे संपर्क करण्यास सांगितले. या नाटकाचा पुढील प्रयोग मुंबई, प्रबोधनकार ठाकरे हॉल बोरिवली मिनी येथे 1 मे 2024 महाराष्ट्र दिनाच्या दिवशी( सुट्टी ) दुपारी 3:30 वाजता होणारं असल्याचे सांगितले व लवकरात लवकर मंडणगड मध्ये नाट्यगृह उभ राहील अशी आशा व्यक्त केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com