बिरवाडीत एका अल्पवयीन मुलींवर आळीपाळीने बलात्कार करून तिला गर्भवती ठेवणारयांवर गुन्हा दाखल..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

बिरवाडी :-महाड तालुक्यातील बिरवाडी-ढालकाठी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती ठेवण्यात आले आहे.

पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहिती असून सुद्धा आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेवर शारीरिक संबंध ठेवले.

१ ) योगेश बाजीराव शिरावले राहणार आकले, व 2) सुरज अनंत कळंबे राहणार वडघर पोस्ट मोहोत, मूळ राहणार उमरट ,तालुका पोलादपूर अशी आरोपींची नावे असून त्यांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

दोघा आरोपींना मा.सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपीं विरोधात भादवी कलम 376,376 (2)(n)(k)(f), तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री विक्रांत फडतरे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट