व्यावसायिक प्रतिस्पर्धेतून दुकानात पिस्तूल व जिवंत काडतूस ठेवणाऱ्यांना मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखा कक्ष १ ने ठोकल्या बेड्या …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरारोड :– ३० मार्च २०२४ रोजी गोल्डन नेस्ट सर्कलजवळ असणाऱ्या अलम स्टील अँड फर्नीचर, येथे काम करणाया इसमांकडे विनापरवाना पिस्टल व जिवंत राउंड आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा लावून फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी (वय ३९) याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुस तर शाकीर अब्दुल वहाब चौधरी (वय-३८) याच्याकडून १ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतुस जप्त करण्यात आली. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात ( गुरक्र १७९/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महा. पोलीस अधिनियम ३७ (१) (क), १३५) गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर दोन्ही इसमांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी माहीती दिली की, फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला व्यवसायामध्ये अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचा मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान, अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचा मालक कमिल खान ऊर्फ कलिम व शादाब स्टिलचा मालक शादाब यांच्या मुळे भरपुर नुकसान झाले. त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याच्यामुळे ओळखीचा व त्याच्याकडे पुर्वी काम करणारा मुस्लीम याच्या हस्ते त्याने ६ गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे मागविले. त्यापैकी दोन गावठी पिस्तुले व जिवंत राऊंड तिन दिवसांपूर्वी त्याने अनिस ऊर्फ मुन्ना खान याचे अमान स्टिल किचन इक्वीपमेंट या दुकानातील वडापाव/पाणीपुरी साठीचे काऊंटरच्या कपाटामध्ये ठेवले तर दोन पिस्तुले व १२ राऊंड त्याने एका सॅक बॅगेमध्ये ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकून दिले. तसेच त्याचे कडे सापडलेले पिस्तुल व राऊंड तो एक दोन दिवसात अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचा मालक कमिल खान ऊर्फ कलिम याचे दुकानात ठेवणार होता. तसेच शाकीर अब्दुल वहाब चौधरी याचे ताब्यात मिळुन आलेले पिस्तुल व राऊंड तो एक दोन दिवसात शादाब स्टिलचा मालक शादाब याचे दुकानात ठेवणार होता अशी माहीती दिली. त्यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे पडताळणी करता, आरोपीतांनी अनिस ऊर्फ मुन्ना खान याचे अमान स्टिल किचन इक्वीपमेंट या दुकानातुन सोहमकुमार यांना विक्री केलेल्या वडापाव/पाणीपुरी साठीचे काऊंटरच्या कपाटामध्ये मिळून आलेल्या २ गावठी पिस्टल व ४३ जिवंत राउंड प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाणे (गुरक्र २२०/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महा. पोलीस अधिनियम ३७ (१) (क), १३५) गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाईमध्ये एकुण ४ गावठी पिस्टल व ५९ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आली

ही कारवाई. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि-१, मा. श्री. मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, गुन्हे शाखा, मा. श्री विजयकुमार मराठे, सहा पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सपोनिरी पुष्पराज सुर्वे, सपोउपनि संदीप शिंदे, हवालदार अविनाश गर्जे, हवालदार संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, हवालदार सचिन सावंत, हवादार विजय गायकवाड, सुधीर खोत, विकास राजपुत, अंमलदार प्रशांत विसपुते, अंमलदार सनी सुर्यवंशी, पोशि/गौरव बारी, अंमलदार धिरज में गाणे तसेच काशिमिरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोउपनि खाडे व पोहवा-मोहीले यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट