मोटर सायकली चोरट्यास स्था.गु.शा.गोंदिया पथकाने केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-गोंदिया शहर पो . स्टे. ला.दाखल दोन गुन्ह्यांची उकल…. चोरीच्या 2 मोटार सायकली हस्तगत ..*
याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, फिर्यादी नामे- चंद्रकांत बाबुलाल अग्रवाल रा.गंज वॉर्ड, कुडवा लाईन, गोंदिया यांची मालकीची हिरो स्प्लेंडर कंपनीची मो. सायकल दुकाना समोरून उभी करुन ठेवलेली दिनांक-29/03/2024 चे 07/00 वा.ते 07/45 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/024 कलम 379 भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आले होते…..
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे सदर गुन्ह्याचे समांतर तपासात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपी व मोटर सायकल चा शोध घेवून मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे – आरोपी नामे- फैय्यज तौफिक कुरेशी वय 26 वर्षे रा. मंतर चौक, गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले…..
*गुन्ह्यातील चोरीस गेलेली मो. सा. आणि ईतर चोरी संबंधाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता नमूद आरोपी यांनी गुन्ह्यात चोरी गेलेली मोटर सायकल त्याचा साथीदार- 2) *फरार आरोपी नामे – अतुल भावे रा. फुलचुर गोंदिया याचे सोबत मिळून मोटर सायकली चोरी केल्याचे सांगितले….
आरोपीचे ताब्यातून गोंदिया शहर दाखल गुन्ह्यातील चोरीच्या मो. सा.-
1) हिरो स्प्लेंडर कंपनीची मो.सा. एम. एच- 35/ ए. डी. 9099 किमती – 60,000/-रु…
तसेच गुन्हा क्रं. 55/24 कलम 379 भादवी गुन्ह्यातील चोरीस गेलेली मो.सा-.
2) एच. एफ. डिलक्स एम. एच- 35/ डब्लू. 5903 किमती – 20,000/-रु…..
अश्या एकूण दोन चोरीच्या मोटार सायकली आरोपीकडून हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत……पो. स्टे. गोंदिया शहर येथे दाखल गुन्हा क्रं. 214 /2024 व 55/2024 अश्या दोन गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे…..आरोपी नामे- फैय्यज तौफिक कुरेशी वय 26 वर्षे रा. मंतर चौक, गोंदिया यास गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे…… चोरीच्या गुन्ह्यासंबंधाने अधिकचा तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहेत…
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक – दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पो.हवा.राजु मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, नेवालाल भेलावे, सुजित हलमारे, रियाज शेख, पो. शि.संतोष केदार ,घनश्याम कुंभलवार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com