खंडणी विरोधी पथकाने आयशर कंटेनरसह एकुण ५५,९०,०००/- रू किमतीचा गुटखा जप्त करून २ आरोपींना केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालु राहणार नाहीत, तसेच पाहिजे फरारी आरोपी पकडण्याबाबत मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व अंमलदार यांना माननीय यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणेचाबत सुचना दिलेल्या आहेत.

त्या अनुषगाने दिनांक २९/०३/२०२४ रोजी पोशि/१९८४ अरविंद शेजवळ, नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधीत गुटखा मालाचे संबंधाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने केलेल्या छापा कारवाई दरम्यान दिनांक २९/०३/२०२४ रोजी २२:३० वा चे सुमारास राजलक्ष्मी कंपाउंड, एम गोडावुन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर, काल्हेर, भिवंडी येथे इसम नामे
१) शरीफसाब अब्दुलगौस सावनूर वय ३२ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. पठाण गारमेंट चाळ, नाजीर तंखनी यांचे खोलीत, खोली नं. ५, मशिद जवळ, ता. शिगाव जि. अवेरी, राज्य कर्नाटक
२) इसाक अहमद अन्यरसाब निजामी वय ३५ वर्षे धंदा ड्रायव्हर, रा. स्वतःचे घर, मामले देसाई स्कुल जवळ, मौलालीनगर ता.शिगाव, जि. अवेरी, राज्य कनार्टक यांचे ताब्यात महारष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंवाख जर्दा असा एकूण ४०,८०,०००/- रूपये किमतीचा माल तसेच त्यांचे ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण ५५,९०,०००/- रू किमतीचा मुद्देमाल ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळून आले. त्याप्रमाणे नारपोली पोस्टे येथे त्याचेविरूद्ध गु.रं.नं. ८६८/२०२४ भा.द.वि. कलम ३२८, २७३, १८८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खंडणी विरोधी पथक करित आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुनो, श्री शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त, शोभ२, गुन्हे शाखा, श्री इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, श्री. शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि सुनिल तारमळे, पोउनि विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा / योगीराज कानडे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेश गुरसाळी पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, मपोहवा/शितल पावसकर, चापोना/ भगवान हिवरे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट