खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले २१,५०,०००/- रूपये किमतीचे एकूण ५० मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना केले परत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-ठाणे पोलीस आयुक्तालयाचे ह‌द्दीतील नागरीकांचे मोबाईल फोन हरवण्याचे प्रमाण वाढल्याने त्यावावत मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरविलेली मालमत्ता (मोबाईल फोन) शोधून ती संबंधीत नागरीकांना परत करण्याबाचत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाकडून https://ceir.gov.in या वेबसाईटच्या आधारे नागरीकांचे हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवुन त्याबाबत तांत्रिक तपास करून एकूण २१,५०,०००/- रूपये किमतीचे एकूण ५० मोबाईल फोन शोधुन काढून, हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित नागरीकांना खात्रीकरून परत करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त, शोध २, गुन्हे शाखा, श्री इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, श्री. शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि वनिता पाटील, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि भुषण कापडणीस, सपोनि सुनिल तारमळे, पोडनि/ विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोठनि/कल्याण डोकणे, सपीठनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/संजय राठोड, पोहवा गणेश गुरसाळी, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, चापोना/ भगवान हिवरे यांनी केली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयअंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबीवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाश्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की. अशाप्रकारे बोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन बाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे देवुन https://ceir.gov.in या वेबसाईटवर अपलोड करावी.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट