उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहिणी बानकर, मॅडम यांचे मार्गदर्शनात रावणवाडी पोलिसांनीबंदिस्त २१ गोवांशिय जनावरांची केली सुटका..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-2 लक्ष 10 हजाराचा मुद्देमाल हस्तगत……गुन्हा नोंद..
⏩ पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी सन उत्सव आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतुकीवर आळा घालण्याकरीता सर्व ठाणे, प्रभारी यांना निर्देशित केले होते .. या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचना मार्गदर्शनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया- रोहिणी बानकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात रावणवाडी पोलीसांनी दि. 29/03/2024 रोजी एका आयसर ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरांना कोंबुन वाहतुक करीत आहेत अशा प्राप्त खात्रीशीर माहीती वरून मौजा- चंगेरा शेर्ताशवार रोडवर सापळा रचून कारवाई केली असता एक कथ्या रंगाचा सहाचाकी आयसर क्र.एम.एच-37 टी-3114 किंमती अंदाजे 12,00,000/-रुपये (बारा लक्ष) ज्यामध्ये काळ्या, पांढ-या व लाल रंगाचे एकुण 21 नग गोवंसीय जनावरे प्रत्येकी किं. अंदाजे 10,000/-रुपये प्रमाणे एकुण किमती 2,10,000/-रुपये असा एकुण किंमती 14,10,000/- (चौदा लक्ष दहा हजार) रुपये चा दिसुन आला….. सदर ट्रक व जनावारांची पाहणी केली असता आयसर वाहनामध्ये जनावरांचे चारही पाय दोरीने अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने बांधुन त्यांना चारा-पाण्याची सोय व्यवस्था न करता व त्यांना बसण्याची पुरेशी जागा उपलब्ध न करता तसेच जनावरांची कोणतेही प्रकाराची वैद्यकिय उपचाराची सोय न करता त्यांना कोंबुन अवैधरित्या वाहतुक करतांनी मिळून आल्याने पोलीस ठाणे रावणवाडी येथे अपराध क्रं.121/2024 कलम 11, (1) (ड) प्रा. क्र. वा. प्र. अधि. 1960 सहकलम 5 (अ),9 (अ) म.प्रा.सं. अधि.1976 सहकलम 109 भा.दं. वी अन्वये पो.शि. नरेंद्र मेश्राम, पोलीस ठाणे रावणवाडी यांचे तक्रारीवरून *गोवंशिय मालक आरोपी नामे-*
1) फिरोज खान रशीद खान वय 52 वर्षे रा. सेलू बाजार तालुका- मंगरूळपीर जिल्हा वाशिम
2) राजीव शफी कनुज वय 27 वर्ष रा. बाजार टोला, काटी ता. जि. गोंदिया*
3) जितेंद्र हरीलाल अंबुले वय 29 वर्ष रा. बाजार टोला, काटी ता. जि. गोंदिया*
यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे… सदर कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेला मुद्देमाल➖ 1) एक पांढ-या रंगाचा सहाचाकी आयसर क्र.एम. एच- 37 टी-3114 किमती अंदाजे (बारा लक्ष) व ज्यामध्ये 2) काळ्या, पांढ-या व लाल रंगाचे एकुण 21 नग गोवंशीय जनावरे किंमती 2,10,000/-रुपये असा एकुण किंमती 14,10,000/-रुपये (चौदा लक्ष दहा हजार) चा मुद्देमाल ताब्यात घेवुन काळ्या, पांढ-या व लाल रंगाचे एकुण 21 नग गोवंशीय जनावरे यांना त्यांचे चारा पाण्याची सोय व्हावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने विठठल रुक्मिणी ट्रस्ट गोशाळा कोरणी (घाट) येथे दाखल करण्यात आले आहे… सदरची कारवार्ड मा. पोलीस अधिक्षक गांदिया श्री. निखील पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर, मॅडम यांच्या मार्गदर्शखाली पोलीस ठाणे रावणवाडी चे पो.नि. श्री. पुरुषोत्तम अहेरकर, यांचे पोलीस पथकाने कारवाई कार्मागरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com