२२ वर्षीय महिलेला गळा दाबून मारलेल्या खुनाची उखल करण्यात डहाणु पोलीसांना मोठे यश..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

डहाणु :– दिनांक १५ /०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वा. चे पूर्वी डहाणू पोलीस ठाणे हद्दीत लोणीपाडा, पाण्याच्या टाकीजवळ, पिंटू फौजदार गुप्ता यांची चाळ , रूम क्र.०४ ता. डहाणू जि. पालघर येथे अनिशा रवींद्र रेड्डी उर्फ अनिशा बरस्ता खातून वय २२वर्षे रा. डहाणू लोणीपाडा पाण्याचे टाकीजवळ पिंटू फौजदार गुप्ता यांची चाळ रु.०५ ता. डहाणू जि. पालघर मूळ रा. मोहीरामपुर फलटा दक्षिण-२४ परगना जि. परगना राज्य-पश्चिम बंगाल ही अज्ञात कारणावरून मयत स्थितीत मिळून आल्याने प्रथम चाळ मालक पिंटू फौजदार गुप्ता वय ३८वर्षे रा. डहाणू यांनी दिलेल्या खबरीवरून डहाणू पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू रजि. नं.१०/२०२४ सी.आर.पी. सी. कलम १७४ प्रमाणे दिनांक १५/०३/२०२४ रोजी अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.

सदर अकस्मात मृत्यूचे तपासात मयत हिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने अकस्मात मृत्यूचे चौकशी अधिकारी सपोनी/ विजया गोस्वामी यांनी अज्ञात आरोपी याचे विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून डहाणू पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.७८/२०२४ भांदविसं कलम ३०२प्रमाणे दी.१७/०३/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर खुनाचे गुन्ह्याचे गंभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील,पोलीस अधिक्षक, पालघर, व पंकज शिरसाट,अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली, अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू विभाग यांनी स्वतः तपास हाती घेतला व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीत मीनाजिद्दीन अब्दुल अजीज मुल्ला उर्फ रवींद्र रेड्डी वय २६ वर्षे रा. बागदा ठाणा डायमंड हर्बर दक्षिण २४ परगणा राज्य पश्चिम बंगाल असे असल्याचे निष्पन्न झाले, आरोपीच्या शोधार्थ डहाणू पोलीस ठाण्याचे पोउपनि / मंगेश मुंढे, पोना./ मनोज भरसट, पोशी / सुरज लोहार असे पोलीस पथक आरोपीच्या मूळ गावी पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात आले होते, त्या ठिकाणी सतत ७ दिवस राहून भाषेची समस्या असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिताफिने व कौशल्यपणास आरोपीचे ठाव ठिकाण्याची माहिती काढून आरोपी यास ताब्यात घेऊन दि.२२/०३/२०२४ रोजी रात्री ०२.३० वाजता अटक करण्यात आली व आरोपी यास मुदतीत मा. डहाणू न्यायालयात हजर केले असता आरोपीची दी.१/०४/२०२४ रोजी. पावेतो पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

आरोपी त्याच्याकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणू विभाग या करीत आहेत, सदरची कारवाई ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणू विभाग, तसेच रणवीर बयेस, पोलीस निरीक्षक, डहाणू पोलीस ठाणे, सपोनि/ विजया गोस्वामी, पोउपनि/ मंगेश मुंढे, वाचक पोउनी / सूर्यकांत सोनावणे, पोउनी/पवार, सहा.फौ./ कुंदन तरे, पोहवा / खांडवी, रासम नांगरे, पोना / मनोज भरसट, पोना / धोडी, पोशी / सुरज लोहार, पोशी / कदम सर्व नेमणूक डहाणू पोलीस ठाणे तसेच पोहवा / विशाल पाटील पोशी / वाल्मीक पाटील नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाढली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट