घाई गडबडीत रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने आणि आय फोन परत मिळवून दिल्याबद्दल मानले डोंबिवली पोलीसांचे आभार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

डोंबिवली :-आज दिनांक -29/03/2024 रोजी 14.30वा ते 14.45वा दरम्यान मॉर्डन कॅफे, फडके रोड ते टंडन रोड डोंबिवली पूर्व दरम्यान इसम नामें विकास विठ्ठल नाईक 36वर्षे राह. रुणवाल माय सिटी, डोंबिवली पूर्व हे त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलां समवेत ऑटो रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांचे 3मोबाईल (I Phone 15, Nothing Phone -01, samsung -N) एकूण 1,50,000/- व 18ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ब्रेसलेट एकूण -1,02,000/- रुपये तसेच 3200/- रुपये कॅश असलेली बॅग मिस्सिंग झाल्याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाणे मिसिंग क्र – 346/2024 प्रमाणे दाखल होती.

सदर प्रकरणी सपोनि योगेश सानप, पो. हवा 2627/कुरणे, पो. अ -7606/देविदास पोटे यांनी तात्काळ CCtv तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे सदर रिक्षा चा व चालकाचा दावडी, डोंबिवली पूर्व येथून शोध घेऊन त्यांचेकडून वरील नमूद प्रमाणे एकूण 2,55,200/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तो तक्रारदार श्री विकाश विठ्ठल नाईक यांना वपोनि सो यांच्या हस्ते परत केला.

तक्रारदार दांपत्याने डोंबिवली रामनगर पोलिसांचे आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट