विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा गुन्हेगार राम कनोजियास पहा मानपाडा पोलीसांनी कशा ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

डोंबिवली :-दिनांक २६/०३/२०२४ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत टाटा नाका परिसर येथे एक इसम बेकायरेदशीर रित्या विनापरवाना पिस्टल (अग्नीशस्त्र) सोबत बाळगुन फिरत असल्याबाबत माहिती खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याप्रमाणे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करण्यांत येवुन गुन्हयांतील आरोपीतास पकडण्याकरीता सापळा लावण्यात आला.

गुप्त बातमीदार तसेच आरोपीताचे वर्णना नुसार आरोपीताचा शोध घेवून आरोपीत नामे राम उर्फ शिवा फुलचंद कनोजीया वय ४३ वर्षे रा. अमर म्हात्रे चाळ, रूम नं ०१, देसलेपाडा, डोंबिवली पुर्व यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडुन एक विदेशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा एकुण २,००,४००/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपीत याचे विरूध्द मानपाडा, डोंबिवली, पनवेल शहर, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे यापुर्वी ०६ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री दत्तात्रय शिंदे सखो, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण श्री सचिन गुंजाळ साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग श्री सुनिल कुराडे साो, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत आंधळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा/राजकुमार खिलारे, पोहवा/शिरीष पाटील, पोहवा/सुनिल पवार, पोहवा/संजु मासाळ, पोहवा/विकास माळी, पोहवा/दिपक गडगे, पोना/गणेश भोईर, पोना/प्रविण किनरे, पोना/यल्लापा पाटील, पोना/देवा पवार, पोना/अनिल घुगे, पोना/शांताराम कसबे, पोना/रवि हासे, पोशि/अशोक आहेर, पोशि/विजय आव्हाड, पोशि/महेद्र मंझा, पोशि/नाना चव्हाण, पोशि/गणेश बडे यांचे पथकाने केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट