महाड तालुक्यातील पडवी येथे माझ्या सासरी जाते असे सांगुन गेलेली ज्योती रुपेश साळुंखे अद्याप बेपत्ता…

उपसंपादक : राकेश देशमुख
महाड :-महाड तालुक्यामधून पडवी येथे राहणारी 29 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे.
बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेची आई चंद्राबाई बबन सकपाळ राहणार पंदेरी यांनी दिलेले फिर्यादीनुसार ज्योती साळुंखे यांचे वडील यांना ज्योती साळुंखे ही महाड येथे दवाखान्यात घेऊन गेली व पुन्हा आपल्या माहेरी पंदेरी येथे घरी घेऊन आली. व नंतर मी माझे सासरी पडवी येथे घरी जाते असे सांगून निघून गेली ती अद्याप पर्यंत माहेरी किंवा सासरी कुठेच आढळून आली नाही.
ज्योती साळुंखे हिच्या घरच्यांनी जवळच्या नातेवाईकांशी शोध घेतला असता तिचा कुठेच तपास लागला नाही यामुळे तिच्या कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाण गाठलं व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
ज्योती साळुंखे माहेरच्या घरातून जात असताना काळ्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, पिवळ्या रंगाची पर्स, कानात रिंगा असे वर्णन पोलिसांनी नमूद केले आहे.

जर मिसिंग महिला कोणाला आढळून आल्यास त्वरित संपर्क करण्याच्या आव्हान महाड एमआयडीसी पोलिसांनी केले आहे. या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास पोलीस हवालदार आर.व्ही. जाधव हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com