दीड लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलीसांनी ठोकल्या बेड्या …

उपसंपादक-रणजित मस्के
(गडचिरोली) : अहेरी येथील विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी अटक केली.
या आरोपीवर महाराष्ट्र राज्य शासनाने दीड लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ही कारवाई करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले.
फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास(नक्षल. समथर्कास) काल अटक केली. २१ मार्च रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये भामरागड क्युआरटी, पोस्टे भामरागड पार्टी व सिआरपीएफचे जवान पोस्टे परिसरातंर्गत नाकाबंदी करीत असतांना उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड अमर मोहीते यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली की, नाकाबंदी ठिकाणाच्या आसपास एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आला आहे.

त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव पेका मादी पुंगाटी (वय ४९ वर्षे, रा. मिरगुळवंचा, तह. भामरागड, जि. गडचिरोली) असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच १९ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १० च्या सुमारास हिद्दूर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावण्यात आलेल्या ३ टॅक्टर व जेसीबी जाळपोळ करुन तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती. या प्रकरणी पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. ९३/२०२३ कलम ४३५, ४२७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब) भादंवि कलम सह ५ , २८ भारतीय हत्यार कायदा सह कलम १३, १६, १८, २०, २३ यूएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरव्यानिशी निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/03/2024 रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. तसेच सन 2016 मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करुन खुन केल्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप क्र. ६/२०१६ कलम ३०२, ३६४, ३५३, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादंवि, सह कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.
सदर नक्षल समर्थक पेका मादी पुंगाटी याचेवर सन २०२३ मध्ये हिद्दुर गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.तसेच सन २०१६ मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. म्हणून महाराष्ट्र शासनाने पेका मादी पुंगाटी याच्या अटकेवर १.५ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७४ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदशर्नाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com