आगामी निवडणूक सन- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलीसांचे धडाकेबाज कोंबिंग ऑपरेशन….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया – रोहिणी बानकर, मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

गोंदिया जिल्हा पोलीसांनी कारवाई दरम्यान 1 पिस्टल, 1 जिवंत काडतूस, 5 तलवारी व 1 गुप्ती केली जप्त, तसेच दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखोंचा मुद्देमाल केला जप्त….. अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांवर केली प्रतिबंधात्मक कारवाई)

⏩ पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी आगामी सन उत्सवाच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत दिवस, रात्र दरम्यान प्रभावी गस्त, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी, राबविण्याबाबत आणि या दरम्यान सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत…. या अनुषंगाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सुचनेप्रमाणे संपुर्ण जिल्ह्यात कारवाई करण्याकरिता मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आले………या दरम्यान अवैध धंद्यावर धाडी, गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी गस्त पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे अवैध शस्त्रे बाळगणारे, दहशत माजविणारे गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याकरिता सम्पूर्ण गोंदिया जिल्हा पोलीसांचे कारवाई पथके नेमण्यात येवुन दिनांक 23-03-2024 ते 24-03-2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आलेल्या असून उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनात पो. नि. श्री. दिनेश लबडे, पो. नि. श्री चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे नेतृत्वात गोंदिया उपविभागातील गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण परिसरात रात्र दरम्यान 21.00 वा ते 03.00 वाजता पर्यंत गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन गोंदिया शहर पोलिसांची सोबतीला सी- 60 पथकाच्या मदतीने

संयुक्तरित्या कारवाईची प्रभावी कोंबिंग ऑपरेशन ची मोहीम राबविण्यात आलेली आहे.

या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गोंदिया शहर मधील पैकणटोली गौतमनगर, कुंभारेनगर, सावराटोली, छोटा गोंदिया, रामनगर, कुडवा, जब्बारटोला या परिसरातील रेकॉर्डवरील व सर्व सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले व त्यांचे घराची झाडाझडती देखील घेण्यात आली… या कारवाई दरम्यान खालील नमूद गुन्हेगार इसम नामे-

1) अतिश संतोष करोसीया, वय 30 वर्षे, रा. पैकनटोली , बाजपेयी वार्ड गोंदिया याचे घरून तीन नग जुन्या तलवारी असा एकुण किं.अं.2330/- रु. चा शस्त्रसाठा

2) आरोपी :- कांतीलाल सुरजलाल ढोमणे, वय 46 वर्षे, रा. वार्ड नं. 1, मुर्ती ता.जि. गोंदियायाचे घरून एक नग जुनी लोखंडी तलवार किं. अं.1300/- रु, व एक नग लोखंडी गुप्ती लाकडी कवरसह किं.अं. 900/- असा एकुण 2200/- रु. चा शस्त्रसाठा

3) आरोपी :- शुभम पुरुषोत्तम हरदीये, वय 25 वर्षे, रा. श्री. भिमटे यांचे घरी, बाजपेयी वार्ड, मुरी रोड गोंदिया,
1) एक लोखंडी पिस्टल मॅग्जीनसह किं.अं. 25,000,/- रु.
2) एक पिवळया धातुचा जिवंत काडतुस किं.अं. 1000/- रु. असा एकुण किं.अं. 26,000/- रु. चा शस्त्र साठा

4) पंकज कुमार चंद्रप्रकाश उर्फ संतोष आग्रे वय 19 वर्षे रा. पैकणटोली गोंदिया याचे घर झडतीत एक लोखंडी तलवार किंमती 1200/- रू. अश्याप्रकारचे
एकूण 5 तलवारी , 1 गुप्ती, 1 पिस्टल, 1 जिवंत काडतूस अग्निशस्त्र, अवैध शस्त्रे तलवारी मिळुन आल्याने हस्तगत करून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे…

त्याचप्रमाणे संपुर्ण गोंदिया जिल्हा स्तरावर –

1) अवैध दारूबंदी कायद्यान्वये एकूण 52 इसमाविरूध्द कारवाई करण्यात आलेली असून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत..

2) एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत- 2 कारवाई

3) जुगार कायद्या अंतर्गत- 2 कारवाई करण्यात आलेली आहे….किंमती एकूण 3 लाख 74 हजार 974/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे…

त्याचप्रमाणे अवैध कृती करणाऱ्या विरुध्द-
1) कलम 110 अंतर्गत-03 कारवाई
2) कलम 93 अंतर्गत- 12 ईसंम विरुद्ध कारवाई
3) कलम 110, 112 ,117 मपोका अंतर्गत-1 कारवाई
4) कलम 107 अंतर्गत – 40 ईसंम विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.

गोंदिया जिल्हा पोलीसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील विशेषतः गोंदिया शहरातील सराईत गुन्हेगारांची व गावगुंडांना कारवाईची धडकी भरली असून पळता भुई थोडी झाली आहे…

गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील जनतेला, नागरिकांना विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना आवाहन करण्यात येते की सण- उत्सव, निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्याकरिता सहकार्य करावे…..अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागू शकते…🙏

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट