रिक्षा चोराला अटक करुन ८ गुन्हांचीनवघर पोलीसांनी केली उल्लेखनिय कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
भाईंदर :– मुंबई व मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रिक्षा चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे ८ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
अभिमन्यु काशिराम कनोजीया (वय ४० वर्षे, व्यवसाय- रिक्षा चालक, रा.रुम नं जी-१०, उ वींग, साई सम्राट सोसायटी, नवघर रोड, भाईंदर पूर्व) हे यांनी (MH-04- GN-6751) आशीष बार समोर रोडवर, नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व येथे रिक्षा पार्क केली. दुस-या दिवशी १९ मार्च रोजी सकाळी-०७.३० या ते पुन्हा रिक्षा घेण्यासाठी गेले असता रिक्षा चोरीला गेली होती. अभुिमन्यू याने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून
नवघर पोलिसांनी (गुन्हा रजि. नं. १ १७४/२०२४ भा.दं.वि. सं. कलम-३७९) गुन्हा नोंद केला.
वारंवार रिक्षा चोरीचे गुन्हे होत असल्याने आरोपींना त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठंनी दिल्या. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनास्थळांची पडताळणी करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्या पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार आरोपी पुन्हा चोरी करण्यासाठी बोरीवली येथे आल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे सापळा लावून शशीकांत मल्लेश कामनोर (वय ३२ वर्षे, व्यवसाय- रिक्षाचालक, रा.लींक रोड फुटपाथवर मंडपेश्वर मेट्रोस्टेशनच्या बाजुला, बोरीवली पश्चिम, में बई मुळगाव गंजीखेड, जि.गुलबर्गा, कर्नाटक) हा मिळून आला होता. नमुद आरोपी यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आतापर्यंत केलेल्या ८ गुन्ह्यांची माहिती दिली.
या कारवाईमुळे एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे व नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या ७ लाख ६९ हजार रुपयांच्या ७ रिक्षा जप्त करण्यात आल्या. सदर गुन्हयातील आरोपी याचे विरोधात भाईंदर पोलीस ठाणे गु.रं.नं. १२०५/२०१६ कलम ३९२ भादविस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे तपासादरम्यान समजले.

ही कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त
मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१ प्रकाश गायकवाड, एसीपी राजेंद्र मोकाशी यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सपोनि संदिप पालवे, पोउनि ज्ञानेश्वर आसबे, सपोउपनि गौतम तोत्रे, हवालदार भूषण पाटील, हवालदार संतोष पाटील, हवालदार सुरेश चव्हाण, हवालदार नवनाथ पुगे, अंमलदार ओंकार यादव, अंमलदार सुरजसिंग धुनायत अंमलदार अस्यर, पवार, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान कुणाल हिवाळे यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com