तर आता रडायचं नाही! तर लढायचं!! सावित्री नदी खाडीपट्टा रायगड व रत्नागिरी जिल्हा संघर्ष समितीची स्थापना!!!

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल

आंबेत: आंबेत/पंदेरी कोंडगाव: आज दिनांक शुक्रवार रोजी आंबेत रेस्ट हाऊसमध्ये सर्व पक्षीय व सर्व धर्मीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सभे मधील मुळ आणि प्रमुख विषय आणि मुद्दा हा आंबेत म्हाप्रळ पुल हा महत्त्वाचा घटक म्हणून होता. त्याचबरोबर सावित्री नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या महाड औद्योगीक क्षेत्रातील सांडपाणी आणि त्यामुळे होणारे प्रदूषण, अवैध वाळू खणन, अवैध वाहतूक, त्याव्यतिरिक्त सावित्री नदी खाडीपट्टा संबंधित अनेक गावांतील व विकास संदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मंडणगड तालुका व म्हसळा व इतर खाडीपट्ट्यातील आजूबाजूच्या नागरीकांची शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. अनेक उपस्थित असलेल्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापले मुद्दे मांडले जमलेल्या सर्व लोकांनी ऐकले आणि मांडलेल्या मुद्द्यांना भरभरून प्रतिसाद दिला. जमलेल्या सर्व लोकांनी सहकार्याने व सहमती आणि अनुमोदनाने एक पंधरा सदस्य संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. व येणाऱ्या काळात या संघर्ष समिती मार्फत आंबेत म्हाप्रळ पुलाच्या मागणीचा व सदर डागडुजी साठी बंद अवस्थेत असलेल्या कामाचा पाठपुरावा व नवीन पुल बांधकामासाठी संघर्ष समिती मार्फत पुढील वाटचाल व प्रयत्न केले जातील. आज जी समिती स्थापन करण्यात आली, त्या समितीचे नाव “सावित्री नदी खाडी पट्टा रायगड, रत्नागिरी जिल्हा विकास संघर्ष समिती” म्हणून सर्व मते मान्यता देण्यात आली. व सभेत असलेल्या सर्व सदस्यांनी त्याला एकमुखी मान्यता दिली. समितीतील सदस्यांची निवड झाली त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

१) श्री. मुफ्ती खालिद साहेब झटाम. अध्यक्ष.

२) श्री. फारुख हजवाने. उपाध्यक्ष.

३) श्री. जमीर माखजनकर. कार्याध्यक्ष.

४) श्री. गणेश म्हाप्रळकर. सरचिटणीस.

५) श्री. अबरार झटाम. सहसचिव.

६) श्री. आक्रम झटाम. समन्वयक.

७) श्री. फरीद उबारे. खजिनदार.

८) श्री. फरीद डावरे. सल्लागार.

९) श्री. यशवंत गमरे. सह सल्लागार.

१०) श्री. अजहर मुकादम. सदस्य.

११) श्री. मुजफ्फर मुकादम. सदस्य.

१२) श्री. मुकेश आंबेकर. सदस्य.

१३) शाहनवाज डावरे. सदस्य.

१४) श्री. कैस उबारे. सदस्य.

१५) श्री. सज्जाद हसवारे. सदस्य.

या सर्व सामान्य सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच या समितीची अधिकृत नोंदणी केली जाईल व येणाऱ्या २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिना पासून ही संघर्ष समिती सावित्री खाडीपट्टा विकास संबंधित जनहितार्थ एल्गार पुकारणार व आपल्या धडक कार्याची सुरुवात करणार असं निश्चय करण्यात आला. सभेस जमलेल्या सर्व खाडीपट्ट्यातील नागरिकांनी वरील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. सभेचे सुत्र संचालन कुराण पाटण श्री. मुफ्ती खालिद साहेब झटाम यांनी केले तर समाप्ती आणि आभार श्री. आक्रमक झटाम यांनी व्यक्त केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट