व्यापाऱ्यांचा पाठलाग करून लुटणाऱ्या २ आरोपींच्यानवी मुंबई गुन्हे शाखा २ ने मुसक्या आवळून ७ गुन्हे केले उकल..

उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुबंई:-नवी मुंबई परिसरातल्या व्यापाऱ्यांचा पाठलाग करून कारच्या काचा फोडून मुद्देमाल पळवणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अजय गोपाळ चौहान (३८, रा, कल्याण- शिळ रोड, खिडकाळी, ता. जि.ठाणे मुळ राहणारा राजस्थान), रोहन अशोक कंजर ( २४ , रा. कोपरखैरणे, नवी मुंबई, मुळचा राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.
काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हदिद्मध्ये एपीएमसी मार्केट तसेच इतर मार्केटमधील व्यापाऱयांवर पाळत ठेवून त्यांच्या कारचा पाठलाग करुन त्यांच्या नकळत पार्क केलेल्या कारची काच फोडून त्यातील पैशांची बॅग चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे नवी मुंबई परिसरातील व्यापा-यांमध्ये दहशत निर्माण झाली. या गुन्ह्यांमुळे वाढलेली दहशत लक्षात घेता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे, एसीपी अजयकुमार लांडगे यांनी आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी सूचना दिल्या. पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या अशा गुन्हयांची माहिती प्राप्त करुन त्यांच्या घटनास्थळांना भेटी देवून आरोपीच्या बाबतीत तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणारी एक विशिष्ट आंतरराज्यीय टोळी नवी मुंबई परिसरात सक्रीय झाल्याचे निष्पन्न झाले. नवी मुंबई व ठाणे परिसरातील तांत्रिक तपासावरुन सदर टोळीचा शोध घेतला त्यामध्ये आरोपी हे त्यांच्या ताब्यातील दोन्ही स्कुटीच्या नंबर प्लेट काढून मार्केट परिसरात व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्याच्या कारचा पाठलाग करून सदर कार पार्क केल्यावर कारची काच फोडून पैशाची बॅग चोरी करून पळून जातात. गुन्हा केल्यानंतर सदरचे आरोपी दुस-या एरियात जावून कपडे बदलून, स्कुटीला नंबर प्लेट लावून पैशाची आपसांत वाटणी करुन वेगवेगळया दिशेने निघून जात असल्याचे निष्पन्न झाले होते. १९ मार्च २०२४ रोजी सदरचे आरोपी हे घणसोली परिसरातील एका मैदानात अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याबाबत तांत्रिक तपासाद्वारे तसेच गोपनिय बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली होती त्याअनुषंगाने तात्काळ सदर ठिकाणी जावून सापळा रचून दोन आरोपींना त्यांनी गुन्हयात वापरलेल्या नंबर प्लेट नसलेल्या एक्सेस स्कुटीसह ताब्यात घेण्यात आले होते.

या आरोपींकडे केलेल्या चौकशीत मोटारसायकल, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मारूती सेलोरीओ कार हस्तगत केली असून, सदर आरोपीनी चोरलेल्या पैशांतून सोन्याचे दागिने बनवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा गुन्हा त्यांनी त्यांचे साथीदार संतोष चौहान, विशाल सिंह व अनिकेत उर्फ लाला चारी सर्व राह. भरतपूर, राजस्थान यांच्या साहयाने केला असल्याची कबुली दिली आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून मोटरसायकल, एक सेलोरीओ कार, पत्नीच्या खात्यातील फिज केलेली रक्कम असा एकूण १३ लाख ६४ हजार ५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे आरोपी हाती लागल्याने न्हावाशेवा, एपीएमसी, सानपाडा, पनवेल शहर, नेरुळ, खारघर पोलीस ठाण्यातील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही उल्लेखनिय कारवाई गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, हवालदार मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, रणजित पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, राहुल पवार, जगदिश तांडेल, पोलीस नाईक आजिनाथ फुंदे, विक्रांत माळी, नंदकुमार ढगे, अमोल मोहिते, अदिती काकडे यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com