महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमुळे पुण्यातील एका चिमुकल्याची साडेसहा लाखाची हृदय शस्त्रक्रिया मोफत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-पुण्यात एका शेतकऱ्याच्या पाठीशी उभ राहून साडेसहा लाख इतक्या खर्चाची अकरा वर्षीय चिमुकल्याची हृदय शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करून देण्यामध्ये आली.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत मुक्काम पोस्ट नानोली,तालुका मावळ,जिल्हा पुणे येथे राहत असलेल्या 11 वर्षीय कुमार कार्तिकेय लोंढे या लहान मुलाचे शस्त्रक्रियेसाठी कोकिलाबेन रुग्णालयामार्फत सहा लाख 28 हजार इतका अंदाजित खर्च सांगितला होता.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे मुंबई कार्यालयातून श्री रितेश गोसावी यांच्यामार्फत कोकिलाबेन रुग्णालयात संपूर्ण खर्च माफ करून चिमुकल्याची हृदयाची शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत मध्ये करण्यात आली.

या लहान मुलाचे नातेवाईक अत्यंत गरीब व शेतकरी असून त्यांना हा खर्च परवडणारा नव्हता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना या शेतकरी कुटुंबाच्या पाठी उभे राहून 6 लाख 28 हजार इतक्या खर्चाची संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत मध्ये करून देण्यात आली.

शेतकरी कुटुंबाने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री माननीय श्री राहुल दुबाले साहेब व गोसावी मुंबई अध्यक्षयांचे आभार व्यक्त केले. अशी माहिती श्री
रितेश सुनील गोसावी यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट