पालघर मध्ये 25 एकर जागेवर लवकरच मध्यवर्ती कारागृह बांधण्यात येणार…!

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-पालघर जिल्ह्यात लवकरच मध्यवर्ती कारागृह बांधण्यासाठी 630 कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.

कैद्यांसाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या या कारागृहाची क्षमता 1500 कैद्यांची राहणार असून. यामुळे ठाणे आणि तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पालघर जिल्ह्यातील 500 हून अधिक कैदी ठाणे व तळोजा येथील कारागृहात ठेवण्यात आहेत.

त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात ने आन करण्यासाठी पोलिसांना अनुक्रमे 100 ते 125 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ लागत असून कैद्यांना न्यायालयात आणण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे.

मध्यवर्ती कारागृह उभारण्यासाठी पालघर जिल्हा निर्मितीपासून प्रयत्न सुरू असून त्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यानुसार उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे. पालघर जवळील उमरोळी येथील शासनाच्या अख्यातरित असलेली सर्वे क्रमांक 308 मधील सुमारे 230 एकर जागापैकी मध्यावर्ती कारागृहासाठी 25 एकर जागा निश्चित करण्यात येऊन ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुरुंग प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट