पालघरमध्ये शेअर रिक्षा सुरू करण्याची-शिवसेना श्री. केदार काळे यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी…

प्रतिनिधी- महेश वैद्य
पालघर : गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी पालघर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे .
जिल्हाधिकारी कार्यालय ,पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व इतर शासकीय 40-50 कार्यालय पालघर येथे सुरू आहेत.
अनेक उद्योगधंदे व शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात पालघरला सुरू आहे .
पालघर शहर वाढत असल्यामुळे पालघर शहराची वस्ती पूर्व व पश्चिम भागात स्टेशन पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर पसरत चाललेली आहे म्हणून त्यासाठी तीन चाकी ऑटो रिक्षा हा एक चांगला पर्याय आहे.
सर्वसामान्य माणसांना संपूर्ण रिक्षा भाड्याने करणे खूप वेळेला शक्य होत नाही.
म्हणून ज्या पद्धतीने वसई, विरार रेल्वे स्टेशनच्या बाहेर तीन चाकी शेअर रिक्षा सुरू केल्या आहेत, त्याप्रमाणे पालघर रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिमेस तीन चाकी शेअर रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी शिवसेना पालघर लोकसभा सह समन्वयक केदार काळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांच्याकडे केली .तशा पद्धतीचे निवेदन परिवहन अधिकारी प्रल्हाद चिंगले साहेब यांच्याकडे दिले .तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मेलद्वारेही निवेदन पाठविले. केदार काळे यांनी पालघर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेहून व पश्चिमहुन पुढील रूट सुचवले आहेत
पालघर स्टेशन पश्चिमेकडील शेअर रिक्षाचे रूट
1) पालघर स्टेशन ते कामला पार्क वळण नाका .
2)पालघर स्टेशन ते तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कोर्ट बिडको नाका.
3) पालघर स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक , सोनोपंत दांडेकर कॉलेज .
4)पालघर स्टेशन ते प्रशासकीय संकुलन .
5)पालघर स्टेशन ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौक, टेभोडे नाका ,आल्याळी .
6)पालघर स्टेशन ते आर्यन शाळा.
7) पालघर स्टेशन ते चाफेकर कॉलेज.
- पूर्वेकडील शेअर रिक्षाचे रूट
1)पालघर स्टेशन ते सेंट जॉन कॉलेज, गणेश नगर ,नंडोरा नाका.
2) पालघर स्टेशन ते नवली 3)पालघर स्टेशन ते घोलविरा वरील मार्गा विषयी रिक्षा युनियन बरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा , म्हणजे सर्वसामान्य जनतेची सोय होईल व रिक्षाचालकांनाही व्यवसाय मिळेल. असे आपले निवेदनात नमूद केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com