खेळ निहाय निवड चाचणीत पालघर जिल्ह्यातील 2223 खेळाडूंचा सहभाग…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-पालघर 14 मार्च पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत पालघर क्रीडा संकुल मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 11 खेळांची खेळ निहाय निवड चाचणीत जिल्ह्यातील 2223 खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वय वर्ष 14, 17, 19 वयोगटातील खेळाडू मुले व मुलींसाठी 11 विविध खेळा प्रकाराची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती यामध्ये (मोटर ॲबिलिटी) खेळाडूंची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी पाच चाचण्या घेण्यात आल्या या चाचण्यांमध्ये खेळाडूंची ताकद दमदारपणा सहचर्यता वेग आक्रमकता या अनुषंगाने प्रत्येक खेळात खेळाडूंची चाचणी घेण्यात आली यामध्ये खो-खो, कबड्डी, मैदानी खेळ, व्हॉलीबॉल, हँडबॉल, फुटबॉल, आर्चरी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन व शूटिंग प्रकारात निवड चाचणी घेण्यात आली या निवड चाचणीसाठी 16 तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यामध्ये राष्ट्रीय राज्य स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षकांचा सहभाग होता.

या निवड चाचणीमधून उत्कृष्ट खेळाडू निवडून सकाळी व संध्याकाळच्या सत्रात दोन्ही वेळेत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या खेळाडूस योग्य प्रकारचा गणवेश व इतर सुविधा प्राप्त होणार आहेत. पालघर जिल्ह्यातील खेळाडू राज्य राष्ट्रीय व पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपला ठसा उमटवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी सांगितले.

या निवडचाचणीत पालघर जिल्ह्याचे सुपुत्र छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू केकृश्री इराणी यांनी स्वतः रायफल शूटिंग प्रकारात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला

चौकट पालघर जिल्ह्यात विविध क्रीडा प्रकारात सन 2023 24 या वर्षात दोन राज्यस्तरीय स्पर्धा 11 विभागीय स्तरावरील स्पर्धा आणि दोन राष्ट्रीय स्पर्धेचे कॅम्पचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर मार्फत करण्यात आले

प्रतिक्रिया सन 2028 व 2032 या वर्षात होणाऱ्या ऑलिंपिक मध्ये पालघर जिल्ह्याचा खेळाडू सहभागी होईल असा आमचा मानस आहे. आणि तो यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा प्रशासनाचे कसोशीने प्रयत्न राहणार आहेत. यासाठी खेळाडूंना जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन खेळाडूस उपलब्ध करून देईल.
गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट