जिवे ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ आरोपीतांना ५ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा….!

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– माननीय श्री. ए. टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, न्यायालय गोंदिया, यांचे दिनांक- 12/03/2024 रोजीचे आदेश गुन्ह्यातील क्रं .1 व 2 आरोपीतांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावणवाडी पोलीसांचे उत्कृष्ठ तपासकार्य*
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गुन्ह्यातील फिर्यादी नामे- श्री.सहेदलाल चंभारु बिरणवार रा. चारगांव ता. जि. गोंदिया यांनी घराचे बांधकाम करण्याकरीता फोंडेशनसाठी खड्डे खोदले असता घटना ठिकाण मौजा- चारगाँव ता. जिल्हा गोंदिया येथे दिनांक-18/ 06/ 2019 रोजी चे 20/30 वा. दरम्यान आरोपी नामे –
1) हनसलाल गोपीचंद नागपुरे
2) दिपक हनसलाल नागपुरे
3) छोटेलाल श्यामलाल नागपुरे
4) गिरीजाशंकर चंदन दमाहे
5) गिरधारी श्यामलाल नागपुरे
6) सागराबाई गिरधारी नागपुरे
7) मैनाबाई हनसलाल नागपरे, सर्व रा. चारगांव, ता. जि. गोंदिया यांनी संगणमत करुन फिर्यादी च्या प्लॉट वरील खोदलेले खड्डे बुजवित असतांना फिर्यादीने आरोपीतांना हटकले असता नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीला लाथा, बुक्यांनी मारपिट केली….व शिविगाळ करुन फावड्याने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन गंभीर रित्या जख्मी केले….. व जीवे मारण्याचा प्रयत्न केला ….असे फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस ठाणे रावणवाडी येथे अप.. क्र. 106/2019 कलम 307, 143, 147, 148, 504, 506, भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते…
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा. रितसर तपास करण्यात आला. आणि गुन्ह्याचे तपासाअंती सबळ साक्षपुरावे गोळा करून गुन्ह्यातील आरोपीतां विरुध्द गुन्हा निष्पन्न झाल्याने नमुद आरोपी क्रमांक 01 ते 07 यांच्यां विरुध्द गुन्ह्यात दोषारोप पत्र क्र.91/2019 दिनांक 25/11/2019 अन्वये तयार करुन मा. न्यायालयात दाखल करण्यात आले होते….मा. न्यायालयाकडुन सदर गुन्ह्याचे केस क्र. 596/ 2019 दिनांक 03/12/ 2019 अन्वये न्यायालयात खटला चालविण्यात आला…
सदर गुन्ह्याच्या खटल्यामध्ये मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. ए.टी. वानखेडे साो,. जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया यांनी आज दिनांक- 12/03/2024 रोजी सदर गुन्ह्यातीलआरोपी क्र.-
1) हनसलाल गोपीचंद नागपुरे व
2) दिपक हनसलाल नागपुरे रा. चारगांव ता. जि. गोंदिया
यांना सदर गुन्ह्यात 5 वर्ष सश्रम कारावास व 5,000/- रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिने अतिरिक्त सश्रम कारावासा ची शिक्षा सुनावण्यात आली आहे…. व आरोपी क्र. 03 ते 07 यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे… पोलीस अधिक्षक, मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया – रोहीणी बानकर, मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोउपनि विनोद जोकार, पो. हवा. संजय चौव्हाण यांनी उत्कृष्टरित्या तपास केलेला असुन पो. नि. पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पो.शि. यादोराव कुर्वे, यांनी सदर गुन्ह्याचे खटल्याचे न्यायालयीन कामकाज पाहीले…. तसेच सदर गुन्ह्यात सरकारी अभियोक्ता श्री. खंडेलवाल, यांनी सरकारी पक्षाची बाजु मांडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com