कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणाऱ्याच्या Api योगेश सानप व सहकाऱ्याने आवळल्या मुसक्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-ओला कारचालकाला कोयत्यासारख्या धारदार शस्त्राचा 25 धाक दाखवून लुबाडण्यात आल्याची घटना पूर्वेकडील शिवमंदिर रोडवरील रामपंचायतन सोसायटी समोरील रोडवर रविवारी सकाळी ७:३०च्या सुमारास घडली.

दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल होताच काही तासांतच आरोपी अद्वैत शिंदे याला रामनगर पोलिसांनी अटक केली.

ओला कारचालक युसूफ मन्सुरी हा शिवमंदिर रोडवर भाडे मिळण्याची प्रतीक्षा करीत होता. त्याठिकाणी अद्वैत आला आणि त्याने कोयत्यासारखे शस्त्र युसूफच्या गळ्याला लावले. मी एरियामधला भाई आहे, तुझ्या गाडीमध्ये जे काही असेल ते पटकन काढून दे, असे त्याने धमकाविले. युसूफने घाबरून आरडाओरड केली.

त्यामुळे रस्त्यावरून जाणारे काही लोक तेथे जमा झाले. कोणी पुढे आलात तर तुम्हाला सुद्धा खुपसून टाकेल, असे अद्वैतने त्यांनाही धमकाविले.

त्याने युसूफच्या खिशातील मोबाइल आणि ५०० रुपयांची रोकड काढून तो निघून गेला. दरम्यान, युसूफने तत्काळ रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी अद्वैतला अटक केली आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट