पालघर मध्ये “दुरितांचे तिमिर जावो”पुस्तकाचे प्रकाशन-डाॅ.उज्ज्वला काळे (नगराध्यक्षा)

0
Spread the love

पालघर (पश्चिम)

प्रतिनिधी- महेश वैद्य

ज्ञान संपन्न झाला की आत्मविकास होतो -नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे
श्री जगदीश घरत यांचे दुरितांचे तिमिर जावो या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले
मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी पालघर पश्चिम येथील लेन्स क्लब हाॅल येथे श्री.जगदीश घरत यांच्या दुरितांचे तिमिर जावो या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्ष्या ,पालघर नगरपरिषद आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.


दुरिताचे तिमिर जावो या पुस्तकातील ज्ञानरुपी संकलन आणि विचार सकल समाजाला प्रेरणादायक होईल” असे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.उज्जला काळे यांनी विदित केले.तसेच “कोणतीही व्यक्ती वाईट नसते तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्ती वाईट असतात.म्हणून त्या व्यक्तीला नष्ट करण्यापेक्षा त्यांच्या वाईट प्रवृत्ती नष्ट केल्या की उरतो तो निव्वळ शुद्ध माणूस” हे मा. प्राचार्य डॉ.किरण सावे यांनी आध्यात्मिक दाखले देऊन श्रोत्यांना या पुस्तकाची चांगलीच ओळख करुन दिली. पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.केदार काळे, यांनी जगदीश घरात यांचे कौतुक केले ते स्वतः मंत्रालयात उच्चपदावरती काम करत होते , फायली व कागदात फसलेले असतानाही त्यांनी पुस्तके लिहिली याआधी एक त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे ,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व यापुढे असेच साहित्याची सेवा करत रहा व अनेक पुस्तके लिहा अशा शुभेच्छा दिल्या. वेऊर नवली सहकारी सो.चे अध्यक्ष मा.विरेंद्र पाटील,नगरसेविका हिंदवी पाटील, कुणबी समाजोन्नती संघ पालघरचे अध्यक्ष मा.विदुर पाटील, आम्ही कुणबीचे लेखक मा.सतीश घरत, श्री.अतुल घरत,श्री.प्रफुल घरत सर, श्री.जगन्नाथ घरत सर वगैरे मान्यवरांनी दुरिताचे तिमिर जावो या पुस्तकाचे लेखक मा.जगदिश का.घरत यांना ज्ञानमयी शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमाला पालघर गावातील मंडळी आवर्जून उपस्थित होती. दुरिताचे तिमिर जावो पुस्तकाचे सुंदर परिचय भगिनी समाज पालघर शाळेचे विद्यमान शिक्षक मा.दुष्यंत भंडारी सरांनी केले तर या कार्यक्रमाचे सुंदर आणि उद्बोधक सुत्रसंचलन प्रा.संजय घरत सर यांनी केले.उपस्थितांचे आभार सौ.भावना घरत यांनी आदराने आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट