महाड तालुक्यातील शेंदूर मळई येथील घराला लागलेल्या भीषण आगीमध्ये घर पूर्णपणे जळून खाक…

0
Spread the love

उपसंपादक,:राकेश देशमुख

महाड:– महाड तालुक्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदूर मळई या गावातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

काल रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान आग लागल्याचे समजते. शेंदूर मळई येथील रहिवाशी मनोहर राणे, पांडू राणे यांचे 80 ते 90 वर्षापूर्वीच्या जुन्या घराला आग लागल्याने आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली आहे याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट