पालघर जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या दुर्दशामुळे रुगण व नातेवाईकांची होणाऱ्या गैरसोयीची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे घेतली दखल…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :– महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकारण समन्वय समिती सदस्य :- राहुल अर्जुनराव दुबाले साहेब तसेच मुंबई /पालघर जिल्हा अध्यक्ष :- मनीष हरिलाल जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाने पालघर जिल्ह्यामधील पालघर ग्रामीण रुग्णालय पालघर येथील शौचालयाची बऱ्याच दिवसापासून अति दुर्दशा झाली आहे.

महिला प्रस्तुती वॉर्ड तसेच पुरुष वॉर्डचे शौचालय भरलेले आहेत. तसेच शौचालयाच्या दरवाजाला कडी कुंडी नसल्याने महिला व पुरुष यांची फार गैरसोय होत आहे.

काही ठिकाणी लाईट नसून दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत त्यामुळे रुग्णांचे व त्यांच्यासोबत येणारे नातेवाईकांना स्वच्छता नसल्यामुळे मच्छरामुळे अतोनात हाल व गैरसोय होत आहे.

त्यामुळे कृपया करून पालघर ग्रामीण रुग्णालय येथील स्वच्छतागृह व शौचालयाची साफसफाई व डागडूजी करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्यावतीने जिल्हा अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण रुग्णालय यांना ०१/०३/२०२४ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष:-संदेश मोरे, सल्लागार:-संजय राऊत, सचिव:- किरण पाटील, संघटक:- अमोल गायकवाड, सदस्य:-ऋषिकेश जाधव व मंगेश उईके :पालघर जिल्हा महासचिव उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट