घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील चोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात आली. विकास घोडके असे आरोपीचे नाव असून या कारवाईमुळे घरफोडीचे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपीवर ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखा, युनिट २ च्या कार्यक्षेत्रात प्रभारी अधिकारी श्री नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली, पोउपनिरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अशी टिम तयार करुन, उघडकीस न आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या. त्यानुसार युनिट-२ चे पोलीस अमंलदार गजानन सोनुने व अमोल सरडे यांना खबऱ्याने आरोपीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे विकास सुनिल घोडके (वय २८ वर्षे, सध्या राहणार. वडगांव शेरी पुणे व मुळगाव रा. मिरी रोड, विद्यानगर, शेवगाव ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९९/२०२३ भा.द.वि.कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा केल्याचे निषन्न झाले. त्याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.

या गुन्ह्यातील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हे करण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी, चावीचा जुडगा (गुछा) तसेच इतर गुन्हयातील ७७.२६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सर्व मिळुन ५ लाख ५४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच त्याने सिंहगड पोलीस स्टेशन गुरनं ६०/२०२२ भा.दं.वि. कलम ४५४, ३८०, फरासखाना पोलीस स्टेशन गुरनं ३१/२०२४ भा.दं.वि. कलम ४५४, ३८० हे गुन्हे केल्याचे कबूल केले.

 सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त  प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,  अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२चे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, अंमलदार अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट