दैवज्ञ समाजाचे थोर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे मिरा-भाईंदर घोडबंडर स्थित बस आगर नामकरण…

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल
मिरा-भाईंदर: सोमवार दिनांक २५ जुलै २०२२ रोजी मिरा भाईंदर घोडबंडर स्थितीत बस आगरला दैवज्ञ समाजाचे थोर व्यक्तिमत्त्व असणारे नाना जगन्नाथ शंकर शेठ ह्यांचे नाव देण्यात आले.

कार्यक्रमस उपस्थीत नानांचे नातू श्री. अजित शंकर शेठ, मा. महापौर सौ. ज्योत्स्ना जी हस्नाळे, सभागृह नेता श्री. प्रशांत जी दळवी, स्थानिक नगरसेवक श्री. संजय जी थेराडे, प्रभाग समिती सभापती सौ. रुपाली जी शिंदे (मोदी), माजी परिवहन समिती अध्यक्ष श्री. दिलीप जी जैन, परिवहन सदस्य सौ. वनिता जी बने, श्री. राशिद जी अन्सारी, श्री राजेश जी म्हात्रे, श्री. शिवशंकर जी तिवारी, श्री. लक्ष्मण कांदळगावकर, मा. आयुक्त श्री. दिलीप जी ढोले, अतिरिक्त आयुक्त श्री. संभाजी पनपट्टे, परिवहन विभाग उपयुक्त श्री. स्वप्नील जी सावंत व दिनेश जी कंगुडे.तसेच दैवज्ञ समाजाचे सर्व बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


मिरा भाईंदरचे ज्येष्ठ पत्रकार व दैवज्ञ समाजाच्या सल्लागार मा. श्री. अनिल जी खेडेकर (काका) ह्यांच्या अथक प्रयत्न व शासनाशी पाठपुराव्यामुळे आज नानांचे नाव शासकीय वस्तूला देण्यात आले. सोबत दैवज्ञ समाज परिषद अध्यक्ष श्री. दिनकर जी बायकेरिकर, मीरा भाईंदर दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष श्री. संतोष जी पोतदार, श्री. समाधान जी चाचाड, सौ. सुजाता ताई कशाळकर, सौ. अश्विनी ताई चाचाद, श्री. अमित दादा वेदक, श्री राजेश जी धोंडे, श्री. अक्षय जी चाचड व सर्व सभासदांचे परिश्रम व प्रयत्नांना आज यश मिळाले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट