पालघर मधये” जिथे कमी तिथे तुम्ही” जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम यांची अंगणवाडी सेविकांना शाबासकीची थाप…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– कोरोना सारखे संकट असो, किंवा एखादी योजना राबविणे,यशस्वी करणे यामधे प्रत्येक ठिकाणी माझी अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका,मदतनीस ताई ही अग्रक्रमावर असते, असे सांगून जिथे कमी तिथे तुम्ही असे सांगून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अंगणवाडी सेविका,पर्यवेक्षिका आणि मदतनीस ताईंना शाबासकीची थाप दिली.

आज दिनांक १/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद पालघर येथे महिला व बाल विकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, अंगणवाडी मदतनीस पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की कुपोषण हा जिल्ह्याला लागलेला डाग आहे आणि हळूहळू कुपोषणाचा आकडा कमी होत आहे. SAM बालकांचा आकडा १०० खाली आणण्याचे ध्येय असून तुमच्या मदतीनेच हा डाग पुसण्याचे काम आज अंगणवाडी ताई करीत आहेत. आणि पुढे देखील करत राहतील. वर्षभर तुम्ही गावासाठी, समाजासाठी काम करत असता त्यामुळे तुमच्यावर कधीही कुठलेही संकट आले तरी जिल्हा परिषद कायम तुमच्या पाठीशी उभी असेल असा विश्वास यावेळी उपस्थित सेविका व ताईंना दिला.

यावेळी एकूण ८३ अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामधे मुख्य सेविका ११,अंगणवाडी सेविका प्रथम १२,द्वितीय १२,तृतीय १२ तर अंगणवाडी मदतनीस प्रथम १२, द्वितीय १२, तृतीय १२ असे एकूण ८३ पुरस्कार देण्यात आले.यात प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रु, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, द्वितीय ३ हजार रु, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पुरस्काराची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुरस्कार प्राप्त सेविकचे अभिनंदन केले आणि जिल्हा परिषद मार्फत कुपोषण, स्थलांतर कमी करण्यासाठी जिल्हा परिषद मधे राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली.

उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी तुम्ही करत असलेल्या कमापुढे हा पुरस्कार खूप लहान आहे.असे सांगून सेविकांच्या कामाचे कौतुक केले. सभापती रोहिणी शेलार यांनी आई नंतर मुलाचे पालकत्व स्वीकारणारी दुसरी आई म्हणजे अंगणवाडी ताई असते,त्यामुळे मुलांच्या संस्काराची जबाबदारी देखील तुमच्यावर च असते असे सांगून पुरस्कार प्राप्त सेविकांचे अभिनंदन केले.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
या पुरस्कार वितरणाबद्दल सर्व सन्मानित सेविका, पर्यवेक्षिका आणि मदतनीस यांनी जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले.
यावेळी समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर, कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती संदिप पावडे, महिला व बालकल्याण समिती चे सन्मा.सदस्य,सर्व विभाग प्रमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट