पालघर मध्ये आदिवासीं खेळाडूंसाठी “स्पोर्ट्स टॅलेंट हंट चाचणी” उपक्रमाचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-पालघर मध्ये शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी पाड्यावरील आदिवासी भागातील विदयार्थी-विद्यार्थिनींना,शालेय जीवनात खेळातील प्राथमिक ज्ञान व कौशल्य अवगत होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,पालघर व अजित कुलकर्णी ,एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन,ठाणे यांच्यावतीने तालुका निहाय आदिवासी शाळांतील १० ते १४ वर्ष वयोगटाील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी टॅलेंट हंट उपक्रम राबविण्यात येत आहे.

अजित कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक व त्यांची सपोर्ट टीम यांच्या माध्यमातून,मुख्यत्वे मोखाडा, विक्रमगड,जव्हार, वाडा,तलासरी,पालघर, व वसई ग्रामीण या मधील २०० आदिवासी शाळा मध्ये , हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.याची सुरवात विक्रमगड व वाडा तालुक्यातून करण्यात आली आहे.

या मध्ये एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या वतीने प्रत्येक शाळेत २५,००० रू चे मोफत क्रीडा साहित्य,स्पोर्ट्स एक्सरसाईज चित्रफीती,देण्यात येत आहेत.प्रत्येक शाळेत ३० ते ४० विद्यार्थी निवडून या खेळाडूंना एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन मोफत मार्गदर्शन करण्याचा करार अजित कुलकर्णी, अंतर्राष्ट्रीय क्रीडा मारगदर्शक यांच्या सोबत करण्यात आला आहे.
या मधून निवडले गेलेले खेळाडू यांची ” धाडस “या नावाची स्पर्धा घेतली जाणार आहे. व १ मैल धावणे या साठी “भरारी” या नावाची रोड रेस घेतली जाणार आहे.
हे आदिवासी पाडे हे मुख्य रस्ता पासून आत जंगलात ५ ते ८ km असल्याने या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना सायकली बक्षीस म्हणून देण्याचे ,एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन ने मान्य केले आहे.
या उपक्रमाचा आदिवासी व डोंगरी भागातील शालेय विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com