पालघर पोलीस दलाच्या सबसीडीअरी कॅन्टीन (सुपर मार्केट) व व्यायाम शाळेचे उद्घाटन मा. वि.पो.म.नि.श्री. संजय दराडे यांच्या शुभहस्ते…

प्रतिनिधी-उईके
पालघर:– पालघर पोलीस दल पोलीस कल्याण शाखा अंतर्गत पोलीस कल्याण भांडार ( सबसिडीअरी पोलीस कॅन्टीन) तसेच व्यायामशाळा याचे उदघाटन समारंभ आज दिनांक ०१/०३ /२०२४ रोजी मा. श्री. संजय दराडे (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते
संपन्न झाला.

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस कल्याण भंडार उदघाटन केल्यानंतर त्यांनी स्वत:साठी साहीत्य खरेदी करुन ऑनलाईन पेमेंट केले. पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन ” ना नफा व ना तोटा” या उद्देशाने पालघर जिल्हयातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिनी लागणाऱ्या गृह उपयोगी वस्तु, किराणा माल तसेच इलेक्ट्रॉनीक वस्तु यांच्या विक्रीसाठी पोलीस कल्याण भांडार हे एम.आय.डि.सी. पोलीस ठाणे बोईसरच्या आवारात सुरु करण्यात आली आहे.

सदर भांडार गृहात बाजारभावापेक्षा सवलत देवुन कमी दरात विक्री सेवा केली जात आहे. सदर कॅन्टीनमुळे पालघर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना पैशांची बचत होवुन लाभ होणार आहे. केंद्रीय पोलीस भांडार, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने पालघर पोलीस दलासाठी पोलीस कल्याण भांडार चालु करण्यात आले आहे. पोलीस कल्याण भांडारगृहाचे व्यवस्थापक पोउपनि गायकवाड, कॅन्टीन मॅनेजर पो. हवा / ११८० एम. व्ही. चौधरी / पोहवा ८०२ एम. के. चौधरी हे कामकाज पाहत आहेत.
पोलीसांच्या व्यस्त कर्तव्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्याकरिता पोलीसांनी सदृढ रहावे आणि आपला फिटनेस कायम राखावा हे एक उद्दिष्ट मनाशी बाळगुन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी स्वास्थ्य जीवन संकल्पना मांडली आणि सामाजीक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने तसेच सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस मुख्यालय मैदान कोळगाव येथे सदर व्यायाम शाळा निर्माण झाली. आज दिनांक ०१/०३/२०२४ रोजी मा. श्री. संजय दराडे (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते व्यायाम शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. “पोलीसांनी सततचा बंदोबस्त व २४ तास कर्तव्य बजावत असताना आपल्या आरोग्याकडे कोणत्याही पध्दतीने दुर्लक्ष करु नये करीता सदर व्यायामशाळेचा उपयोग करावा” असे उद्घाटन प्रसंगी मा. संजय दराडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच व्यायाम शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

पोलीस दल पोलीस कल्याण शाखा अंतर्गत पोलीस कल्याण भांडार ( सबसिडीअरी पोलीस कॅन्टीन) तसेच व्यायामशाळा उद्घाटनासाठी मा. श्री संजय दराडे (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, नवी मुंबई, श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती संगीता शिंदे अल्फान्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), श्री विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर, पोनि / श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोनि श्री. शिरीष पवार, बोईसर पोलीस ठाणे, सपोनि श्री अमोल गवळी पोउपनि संदीप पाटील, पोलीस कल्याण शाखा व पोलीस अधिकारी / अंमलदार आणि नागरीक उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com