सेंट जोसेफ सिनियर काॅलेज सातपाला येथे मिरा-भाईंदर,वसई-विरार आयुक्तालय तर्फे विद्यार्थ्याना सायबर गुन्हा बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न…
प्रतिनिधी- अक्षय कांबळे
मिरा-भाईंदर:– St. Joseph’s Senior College Satpala
येथे सायबर जनजागृती कार्यक्रम !!
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थांमध्ये सायबर गुन्हयांचे अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त यांनी आदेशित केलेले होते.
मा. पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतून दिनांक २३/०२/२०२४ रोजी सायबर जनजागृती कार्यक्रम Cyber Awareness Programm आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी पोलीस उप निरीक्षक श्री. प्रसाद शेनोळकर (सायबर पोलीस ठाणे) यांनी १८ ते २२ वयोगटातील महाविदयालयीन विद्यार्थ्यांना खालील विषयांवर सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले.
१) सध्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes.)
२) सोशल मिडीयासंदर्भात घडणारे गुन्हे (Social Media Related crimes / social media etiquette.)
३) ऑनलाईन सायबर गुन्हयांस कश्याप्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती (Precautions to be Taken.)
४ ) ऑनलाईन गुन्हयास बळी पडल्यास तात्काळ कोठे व व कश्याप्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबतची माहिती. (Where and How to Complaint ? )
यावेळी १८ ते २२ वयोगटातील एकुण १५० विदयार्थी व २५ शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद हजर होते.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. असे आव्हान करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
