उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी आणखी दोन सराईत गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून 3 महिन्या करीता केले हद्दपार…
उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री. प्रमोद मडामे,यांचे निर्देश मार्गदर्शनात दवनिवाडा पोलिसांची कारवाई;-

⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे- दवनिवाडा हद्दीतील- जाब देणार ईसम नामे- 1) रामेश्वर उर्फ छोटु आसाराम हटेले राहणार - बिर्सी, पो. दासगाँव, ता. जि. गोंदिया, याचेविरुद्ध पोलीस ठाणे- दवनिवाडा* येथे मारहान करून दुखापत करणे, जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणे, जिवे ठार करण्याचा प्रयत्न करणे, अश्याप्रकारचे गंभीर 4 गुन्हे दाखल आहेत.. तसेच जाब देणार ईसम नामे- 2) दिलीप सकटू मस्करे वय 51 वर्षे राहणार-मुरदाळा ता. जि. गोंदिया, याचे विरुद्ध पोलीस ठाणे- दवनिवाडा येथे अवैधरित्या दारू विक्री, गैरपणे अटकाव करणे, विनयभंग, बलात्कार करणे, दुखापत, हमला करण्याची तयारी करून गृह अतिक्रमण करणे, अश्याप्रकारचे गंभीर 7 गुन्हे दाखल आहेत.
पोलीस ठाणे दवनिवाडा पोलिसांनी नमूद दोन्ही जाब देणार ईसमाविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचे वर्तनात, चारित्र्यात कसलीही सुधारणा झालेली नाही. दोन्ही जाब देणार हे सवयीचे अत्यंत मगरूर व धाडसी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने आणि परिसरातील लोकांच्या मनात त्यांचेविषयी दहशत निर्माण होवून त्यांच्या गुन्हेगारी कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचेविरूद्ध पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे दवनिवाडा यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणेकरीता मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57 (अ), (1) अन्वये हद्दपार प्रस्ताव अनु.क्रं. 5/2023 आणि अनु. क्र. 2/2023 प्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचेकडे मंजुरीस्तव सादर केलेला होता...
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा अतिरिक्त कार्यभार उपविभाग गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, यांनी विहीत मुदतीत दोन्ही हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून नमूद गुन्हेगारांना गोंदिया जिल्हा हद्दीतून 2 वर्षाकरीता हद्दपार करण्याची शिफारस केली होती..
या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया - यांनी दोन्ही सराईत गुन्हेगार जाब देणार यांना 3 महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया, जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिनांक- 28/02/2024 रोजी पारित केले आहे.... हद्दपारीत दोन्ही ईसमांना आदेश प्रत तामील करून गोंदिया जिल्ह्यातून 3 महिन्याच्या कालावधी करीता हद्दपार करण्यात आलेले आहे...
गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया - पर्वणी पाटील, यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून पोलीस स्टेशन दवनिवाडा हद्दीतील नागरिकांनी दोन्ही गुन्हेगार प्रवृत्तीच्या ईसमावर केलेल्या हद्दपार कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे..
सदर हद्दपार कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार उपविभाग गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनाखाली दवनिवाडा पोलीसांनी केलेली आहे....... यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com