पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार समाजसेवक श्री स्वप्नील पाटील यांचा विशेष सत्कार…
उपसंपादक-रणजित मस्के
बार्शी :– आज बार्शी येथे आगमन झालेले समाजकार्यात अग्रेसर असणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक, शिरूर हवेली विधानसभेचे संघटक, येरवडा मध्यवर्ती कारागृह अभीवीक्षक पुणे समितीचे सदस्य श्री मा.स्वप्निल कुंजीर पाटील यांची भेट घेऊन पोलीस जाणीव सेवा संघ विषयी चर्चा करण्यात आली.
तसेच पोलीस जाणीव सेवा संघाची 2024 ची दिनदर्शिका देण्यात आली. कुंजीर पाटील हे सतत समाजकार्यात मोठ्या स्वरूपात अग्रेसर असतात. त्यांनी गरीब जनतेला हॉस्पिटल व इतर ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीची मदत त्यांच्या हातून होत असते.त्यांनी सांगितले की पोलीस जाणीव सेवा संघाला कायम माजी साथ असेल. तसेच त्यांचा शाल-श्रीफळ व गुच्छ देऊन संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे कासारवाडी चे सहकार्य अध्यक्ष चंद्रकांत कदम,हनुमंत निंबाळकर,ऋषिकेश देवधरे,योगेश पाचकुडवे,महिला बार्शी शहर उपाध्यक्ष भाग्यश्रीताई बोंडवे, शुभांगी ताई पुरी,वर्षाताई तरटे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com