सर्तक नागरिकांमुळे व सर्तक उंब्रज पोलीसांमुळे मोटर सायकल चोरटा जेरबंद व ४०,०००/- रुपयेचा मुद्देमाल केला हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– दिनांक २१/०२/२०२४ रोजीचे रात्री. ११.०० वा. ते दिनांक २२/०२/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वा. दरम्यान मोजे चरेगांव ता. कराड गावचे हद्दीत फिर्यादी नामे श्री. कैलास चंद्रकांत माने रा. चरेगांव ता. कराड यांचे राहते घरासमोरुन त्यांची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल क्र. MH 11 AQ 7009 ही अज्ञात चोरट्याने त्यांचे संमती शिवाय मुद्दाम लवाडीने त्याचे अर्थिक फायद्यासाठी चोरुन नेली बाबत उंब्रज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ६८/२०२४ भादंविसं कलम ३७९ प्रमाणे दाखल करणेत आले नंतर सदर घटनेची माहिती श्री. रविंद्र भोरे सहा. पोलीस निरीक्षक यांना मिळाताच त्यांनी तात्काळ उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन अज्ञात आरोपीचा व मोटर सायकलचा शोध घेणे बाबत पो. हवा. ब. नं. ९२२ जगताप, पो. हवा. १३०४ साठे, पो. कॉ. ब. नं. २८ पाटील, पो. कॉ. ब. नं. २४६७ पवार, पो. कॉ. ब. नं. २५१६ माने, पो. कॉ. ब. नं. १११० थोरात, पो. कॉ. ब. नं. २३६६ कोळी, पो. की. च. नं. १०१८ पवार यांना सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस स्टाफ हे उंब्रज पोलीस स्टेशन हडीमध्ये पेट्रोलॉग करीत असताना मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत पाटण ते उंब्रज जाणारे रोडवरील आनंद पेट्रोल पंपा जवळ रोडचे कडेला एक इसम संशयीत रित्या मोटर सायकल घेवून उभा असलेला दिसल्याने त्यास चरेगांव गावतील नागरीक तसेच पोलीस स्टाफ यांनी त्यास पकडून दिले.

सदर इसमाचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विमल गुलजार माझी वय ३८ वर्ष रा. मुशहरी टोला, ग्राम मंगलापूर पोस्ट मंगलापुर थाना संग्रामपुर पुर्वी चम्पारण संग्रामपुर, बिहार असे असलेचे सांगितले त्यावेळी त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी सदर मोटर सायकल ही चरेगांव गावातून चोरलेली आहे अशी कबुली दिलेने त्यास ताब्यात घेवून उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये घेवून येवून त्यास सदर गुन्ह्यचे तपास कामी अटक करणेत आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो, आचंल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. अमोल ठाकुर साहेब, मा. पोलीस निरीक्षक स्थागुशा, सातारा श्री. अरुण देवकर सो, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पो. हवा. सचिन जगताप, पो. हवा. संभाजी साठे, पो. कॉ. हेमंत पाटील, पो. कॉ. निलेश पवार, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. प्रशांत पवार तसेच मौजे चरेगांव ता. कराड गावातील नागरिक यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो. हवा. ब. नं. ९२२ सचिन जगताप हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट