ठाण्यात सीपी गोएंका शाळेच्या विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :– बुधवारी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे पोलिसांनी शाळेच्या सहली दरम्यान शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी जावेद खान या एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
ठाणेतील सीपी गोएंका शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली.
या प्रकरणात सहभागी असलेल्या शिक्षकांचीही शाळा प्रशासन चौकशी करत आहे. जावेद खान शाळेच्या सहलीत खाद्यपदार्थ पुरवठादार म्हणून सामील झाला होता.
सीपी गोयंका शाळा महाराष्ट्रातील ठाण्यातील कापूरबावडी परिसरात आहे. काही दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थी सहशैक्षणिक सहलीला गेले होते.
त्यावेळी आरोपी जावेद खान बसमध्ये विद्यार्थ्यांना खाण्याचे साहित्य देत होता. जावेद खानने बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवताना मुलींचा विनयभंग केल्याचे काही मुलींच्या तक्रारींनंतर समोर आले.
मुलींनी याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com