लाच घेण्यासाठी वहातुकीची कोंडी करणाऱ्या ३९ वहातूक पोलीसांच्या ठाणे आयुक्त श्री आशुतोष डुंबरे यांनी केल्या बदल्या…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :– ठाण्याचे पोलीस आयुक्त मा.श्री.आशुतोष डुंबरे यांनी मुंब्रा येथील ३९ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारात अडकून बदल्या केल्या आहेत.
सर्व पोलीसांना ठाणे पोलीस मुख्यालयात शिक्षा पोस्टिंग अंतर्गत संलग्न करण्यात आले आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंब्रा येथील शिळफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. परंतू या वाहतूक कोंडीचे कारण म्हणजे मोठी वाहने थांबवून पैसे वसूल करणारे वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी. केवळ लाच घेतल्याने येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे मा.पोलीस आयुक्त श्री .आशुतोष डुंबरे यांच्या निदर्शनास आल्यामुळे या बदल्या करण्यात आल्या आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com