नागज खुनाचा छडा लावण्यात सांगली पोलीसांना यश – ४ संशयितांना अटक : अनैतिक संबंध व आर्थिक देवघेवीतून खून…!

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :- बालगांव, ता. १६ विजयपूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील पाटामध्ये टाकलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात कवठेमंकाळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
शरिफ हसनसाब गनवार (वय ३४) खून झालेल्या तरणाचे नाव असून खून अनैतिक संबंध व आर्थिक देवघेवीतून झाल्याचे तपासात उपडकीस आले आहे. रफिक शब्बीर महमदापूर (वय ३२), यासिन अन्वर बल्लारी (वम ३०), मोमिन आंन्वर बल्लारी (वय ३०), अल्लाउदीन महेबुचसाय बावचीं (वय २७) सर्व राहणार खाँजा मस्जिद, जेल दर्गा परिसर, विजयपुर (कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याविषयी पोलिसांनी दिलेली
माहिती अशी १० फेब्रुवारीला विजयपूर – गुहागर राष्ट्रीय महामार्गावर नागज घाटात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे गतीने तपास सुरू केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण व कवठेमंकाळ पोलीस यांच्याकडून तपासासाठी पथके पाठविण्यात आलो होती. पोलिस अधीक्षक संदीप पुगे, अप्पर पोलिस अधीक्षक ऋतू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवठेमंकाळ पोलीस ठाणे यांची स्वतंत्र पथके तयार करून सदर मयताची ओळख पटवून व गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश व मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
सदर गुष्याचा तपास जतचे उपविभागीय होते. एक शाखा पथक लगतचे सोमेक्रॉल हरवलेल्या तपास गोल कर्नाटक ( हरवला शरीफ घुमट हरवलेल्या मयत शरीफ गंनबार याच्या असल्याची पोलीस अधिकारी सुनील साळुंखे करत कवठेमंकाळ पोलिस ठाण्याचे पथक आणि गुन्हा अन्वेषण सांगली यांच्याकडील एक काम करीत असताना त्यांनी घटनास्थळावरील माहिती व सांगली जिल्हे तसेच कर्नाटक राज्याच्या लगतच्या जिल्ह्यातील सर्व व्यक्तीची माहिती घेऊन करीत असताना १४ फेब्रुवारीला घुमट पोलिस ठाणे (विजयपुर येधून ९ फेब्रुवारीला एक पुरुष असल्याची तक्रार पत्नी अमिना गंनवार (अल्लापूर वेस, नुरानी मस्जिदजवळ विजयपूर) हिने गोल पोलिस ठाण्यात दिली होती.
व्यक्तीच्या नातेवाइकांना अनोळखी व्यक्तीचे फोटो व घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू दाखविल्या असता सदरच्या वस्तू नातेवाइकांना खात्री पटली.शरीफ गंनवार याचा पैशाच्या व अनैतिक संबंधातून खून करण्यात आला आहे. रफिक शब्बीर मंहमदापूर याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यातूनच त्याने साथीदाराकडून रफिकने सदरचा खून केला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पथकाने चार आरोपींना अटक केली आहे.

शरीफ हसनसाथ गनवार पाला विजयपूर येथे मारहाण करून त्याचा गळा आवळून व चाकूने त्याच्या छातीवर मारून, त्याचा खून केला. व त्याच्या प्रेताची विल्हेवाट महाराष्ट्र राज्यात जत ते कराड रस्त्यावरवरील नागजपाटात, त्यांच्याकडील चारचाकी गाडीतून आणून घाटात टाकला व पुरावा नष्ट करण्यासाठी अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले असल्याची कबुली दिली संशयित आरोपींनी दिली आहे.
तपासासाठी पोलिस अधीक्षक संदीप युगे, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती ऋतू खोकर, यांच्या मार्गदर्शनासाठी जत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतोश शिंदे, कवठेमंकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, पंकज पवार, कुमार पाटील, विनायक मसाळे, रविराज जमादार बिरोबा नरळे, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, दऱ्याप्पा बंडगर, नागेश खरात, विक्रम खोत, सागर लवटे, संदीप गुरव, सागर टिंगरे, अमर नरळे, प्रकाश पाटील, दीपक गायकवाड सोमनाथ गुंडे, उदयसिंह माळी, मच्छिंद्र बहें, नागेश मासाळ, चंद्रकांत साबळे, श्रीरीत्य व्हणमराठे, निवृत्ती कारंडे, सिद्धेश्वर कुंभार, अभिजित कासार, कॅप्टनसाहेब गुंडवाडे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे यांनी प्रयत्न केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com