सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांची फ्लॅट फार्मवर हरवलेली पर्स परत मिळवून दिल्याबद्दल बोरिवली रेल्वे पोलीसांचे मानले विशेष आभार…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :-पो. शि. 1408 चिकणे यांनी निवेदन करताच बोरिवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब यांनी ठाणे अंमलदार Hc 3344 जाधव यांना फोन करून कळविले की सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पालांडे साहेब यांची पर्स फ्लॅट फार्म क्रमांक १ वर तिकीट काऊंटर वर विसरली आहे.
तरी फ्लॅट फार्म डयुटीचे कर्मचारी यांना सदर पर्स जाऊन चेक करा असे सांगितल्याने पो. शि. 1408 श्री. चिकणे व होमगार्ड 7218 श्री. महाडिक हे गेले असता चॉकलेटी रंगाची मनी पर्स मिळून आली.
सदर पर्स चेक केली असता त्यामध्ये रोख रक्कम 3810/- रुपये, पोलीस ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड असा ऐवज मिळुन आला. याबाबत व.पो.नि. सो.कदम साहेब यांना फोन करून सांगितले.

तसेच सदर पर्स सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांना बोरिवली पोलीस ठाणे मध्ये ठाणे अंमलदार Hc 3344 जाधव यांचे समक्ष श्री. पालांडे साहेब यांचे ताब्यात दिली.
या पोलीसांनी केलेल्या कामगिरीबद्दल श्री. पालांडे साहेब यांनी बोरिवली रेल्वे पोलीसांचे विशेष आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com