35 वा राज्य सुरक्षा अभियान निमित्त मनोर येथे सांगता समारंभाचे आयोजन संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– सडक सुरक्षा. जीवन रक्षा.

महामार्ग पोलीस केंद्र मनोर येथे. जिल्हा तर्फे.35 वा राज्य व केंद्र रस्ता सुरक्षा अभियान दि.15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 नियोजन करुण राबवण्यात आला.महामार्गावरील प्रवासा दरम्यान सुरक्षिततेबाबत शाळकरी विद्यार्थी व उपस्थीत असलेले मृत्यूंजय धूत तसेच आलेले मान्यवर यांना जनजागृती तसेच राबविण्यात येत असलेले अभियान झाले .

   पालघर जिल्ह्यात तसेच मनोर येथे लगत असलेला राष्ट्रीय महामार्ग रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे.वाहन चालक आणि पादचाऱ्यांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांबद्दल जागरूकता निर्माण करणे.जबाबदार आणि सुरक्षित वाहतूक संस्कृती विकसित करणे. ह्या मोहिमेचे घटक: आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनाच विनंती पुर्वक म्हणाले. जे दुचाकीस्वार जर रोजंदारीवर काम करण्यास दुचाकीवर तिहेरी आसन प्रवास करत असेल असे आढळल्यास जी दंडात्मक कारवाई केली जाते त्यातुन त्यांना  शिरस्त्राण ( हेल्मेट) उपलब्ध करावे. दुचाकी स्वाराला वाहतूक पोलीसांबद्दल होणारा गैरसमज त्या प्रती पोलीस संरक्षणार्थ तैनात असतो असा संदेश मिळेल असे भाषण करते वेळेस ते म्हणाले.

तसेच अनेक मान्यवरांचे भाषण झाले. अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना, मृत्युंजय धूत यांना व अहोरात्र झटणारे असे रुग्णवाहिका सेवेस पुरवणारे त्यांचे सत्कार समारंभ करत वाहतुकीचे नियम व शक्तीने चार चाकी आसन व दुचाकी आसन असणाऱ्यांनी सीटबेल्ट व शिरस्त्रान म्हणजेच हेल्मेट याचा प्रवास करते वेळेस नेहमीच वापर करावा. व 35 वा राज्य रस्ते सुरक्षा अभियान हे शाळेत व इतर शिबिरे लावून जनजागृती करावे असे मान्यवरांनी भाषण करते वेळेस म्हणाले.

तसेच मनोर वाहतूक केंद्राचे प्रभारी अधिकारी पवन कुमार ठाकूर यांनी भाष्य करतेवेळी म्हणाले राष्ट्रीय महामार्गावर अहोरात्र वाहनांची ये जा होत असते त्यात गाव पाडे डाव्या उजव्या बाजूने असून रस्ता ओलांडताना व दुचाकी यांना मार्ग ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावं लागतं त्यांनी चारही दिशेला पाहून रस्ता ओलांडावा किंवा दिलेला पर्यायी मार्गाचा वापर करावा. आज सांगता समारंभ मनोर केंद्र येथे आयोजन करून रक्तदान शिबिर तसेच अभियान प्रवेशात आलेले नागरीक यांना हेल्मेट चे वाटप करून जनजागृती केली व पुढे अपघात होऊ नये त्याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले.

35 वा राज्य रस्ते सुरक्षा अभियान सांगता समारंभ मनोर केंद्र येथे आलेले सर्व विद्यार्थी यांना वया, पुस्तके व स्वागत पुष्प यांचे वाटप करून व रक्तदान शिबिर या कॅम्पमध्ये 35 अधिक लोकांनी रक्तदान करून सांगता समारंभ मनोर केंद्र यांचे वाहतूक नियमांचे पालन व सर्वतोपरी समाज माध्यमातून जनजागृती केली जाईल असे वचन घेतले.

यावेळेस 35 वा राज्य रस्ते सुरक्षा अभियान 2024 सांगता समारंभ मनोर केंद्र दुर्वेस पोलीस चौकी मनोर येथे आमदार राजेश पाटील (बोईसर विधानसभा)यांच्या उपस्थितीत. व प्रमुख पाहुणे, आदित्य मानकताला (डायरेक्टर कुमार मेटल इंडस्ट्री) स्मिताताई शिंदे, (ड्रायव्हर कुटुंब आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) राजुदादा सावंत, (ड्रायव्हर कुटुंब आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सचिव) मोहन दहीकर, (महामार्ग पोलीस परिक्षेत्र ठाणे पोलीस निरीक्षक) विजय डोळस, (महामार्ग पोलीस ठाणे विभाग पोलीस उपअधीक्षक) विनोद माळवे, (ठाणे विभाग पोलीस निरीक्षक) सतीष शिवरकर,( मनोर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी) मारुती पाटील, (मुंबई पोलीस निरीक्षक) आणि स्नेहांकीत पवन कुमार ठाकुर, (प्रभारी अधिकारी. केंद्र मनोर) सचिन फडतरे, (पोलीस उपनिरीक्षक मनोर केंद्र)
तसेच समस्त महामार्ग पोलीस केंद्र मनोर. पोलीस अंमलदार यांची उपस्थिति होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट