शिवसंस्कार मंडळ कशेळीच्या वतीनेशिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त शिवज्योत आगमन सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

प्रतिनिधी-सुशील तांबे
राजापूर: कशेळी :– राजापूर तालुक्यातील सन २०१५ मध्ये कशेळी गावातील काही होतकरू तरुणांनी एकत्र येऊन समाजपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने एक मंडळ स्थापन केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्ववान इतिहासाने प्रेरित झालेल्या या युवकांनी आपल्या कामाची सुरुवात लोकमान्य टिळकांप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करून करण्याचे ठरविले.
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी आणि लोकसेवेसाठी सज्ज झालेल्या या समुहाला शिवसंस्कार मंडळ कशेळी असे नाव ठरवण्यात आले.
१९ फेब्रुवारी २०१५ रोजी कशेळी गावात लोकवर्गणीतुन पहिलावहिला भव्य दिव्य असा “शिवजयंती उत्सव” साजरा केला गेला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कशेळी गावात दरवर्षी १८ फेब्रुवारी रोजी शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या सहयोगाने कशेळी गावात “रक्तदान शिबिर” घेतले जाते.

या कार्यक्रममध्ये कशेळी गावासहित पंचक्रोशीतील तरुण सहभागी होतात. या उपक्रमाचा फायदा गावासह इतर लोकांनाही होतो.
रक्तदान शिबिराप्रमाणे या मंडळाच्या वतीने गावात अत्यावश्यक सेवा देखील पुरवण्यात येतात. गावातील रस्ते सुधारणी साठी त्याच प्रमाणे एस. टी ने प्रवास करण्याऱ्या लोकांना सावली आणि पावसापासुन संरक्षण म्हणुन प्रवासी मार्ग निवारा अशी कामे ग्रामपंचायत तर्फे लोकांना मिळवुन देणे अशी कामे मंडळ करते.
कोरोना सारख्या महामारीच्या वेळी गावासह पंचक्रोशीतील लोकांना सर्व प्रकारची मदत त्याच प्रमाणे महापुरच्या वेळी गावातील लोकांकडुन मदत गोळा करून आवश्यक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मंडळामार्फत करण्यात आले.
गावातील लोकांना सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक असलेल आधार कार्ड शिबिर मोफत घेतले गेले .अश्या प्रकारचे आवश्यक उपक्रम गावात घेतले जातात.
गावातील लोकांना सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसेच ग्रामपंचायत तर्फे कामे करून घेण्यासाठी मदत करण्यास हे मंडळ नेहमी अग्रेसर असते.
शिवसंस्कार मंडळाची कार्यकारिणी-:
संस्थापक – रोहित वाडकर
अध्यक्ष – संदेश शिवगण.
उपाध्यक्ष – अनिकेत यादव.
सचिव – कु.सुशांत राडये
सहसचिव – आदित्य राडये.
सल्लागार – जयवंत गुरव,रविंद्र डुकळे.
तरी या वर्षी शिवसंस्कार मंडळ (कशेळी) १० वर्ष पुर्ण करत आहे. त्या निमित्ताने मंडळातर्फे आयोजित सर्व कार्यक्रमात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com