पालघर पोलीसांकडून ” रस्ता सुरक्षा अभियान २०२४” सांगता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी संपुर्ण देशभरात ” रस्ता सुरक्षा अभियान” आयोजित करण्यात येते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही दि. १५ जानेवारी २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ साजरा करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा पालघर यांच्या वतीने दि. १५ जानेवारी २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान २०२४ संपुर्ण पालघर जिल्हयात राबविण्यात आले.

३५ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ च्या अनुषंगाने संपुर्ण जिल्हयात वाहतुक नियमांबाबत जनजागृती व्हावी याकरीता संपुर्ण पालघर जिल्हयात वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम राबवुन खालीलप्रमाणे जनजागृती करण्यात आली.

दि.१५/०२/२०२४ रोजी ” रस्ता सुरक्षा अभियान २०२४ ” सांगता कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा. श्री. राजेंद्र गावित, लोकसभा खासदार पालघर श्री. गोंविद बोडके, मा. जिल्हाधिकारी पालघर श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे शुभहस्ते श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्री. सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक शाखा, पालघर तसेच पालघर जिल्हयांतील प्रतिष्ठीत नागरीक, सर्व पत्रकार बंधु, सर्व शाळा / कॉलेज मधील प्राचार्य, विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच अधिकृत प्रवासी वाहतुक करणारे रिक्षा, काळी पिवळी डमडम इको व डमडम वरिल पालघर जिल्हयातील वाहन चालक व युनियन लिडर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

प्रमुख पाहुणे मा. श्री. राजेंद्र गावित, लोकसभा खासदार पालघर व श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी कार्यक्रमास पालघर जिल्हयातील उपस्थित असलेले दुचाकी / चारचाकी वाहन धारक यांना तसेच सर्व उपस्थितांना वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणे, अपघातास आळा घालणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना आपले वाहन चालविण्याकरीता ताब्यात देवू नये अशा विविध वाहतूकीच्या मुद्दयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.

         "रस्ता सुरक्षा अभियान २०२४ " दि. १५ जानेवारी २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व सांगता कार्यक्रमाचे वेळी खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

१) पालघर जिल्हयांतील महत्वाचे ठिकाणी बॅनर्स लावुन व महत्वाच्या ठिकाणी चौकसभा घेवुन
वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व सुरक्षितरित्या वाहन चालविण्याची माहिती देवुन जनजागृती केली.

२) शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन, रस्ते सुरक्षा विषयांवर हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जावून प्रबोधन करुन वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

३) रस्ते सुरक्षेबाबत जिल्हयांतील सर्व नागरीकांनी वाहतुकीचे नियम पाळणे व परवाना काढणे याबाबत सर्व विभागामध्ये महत्वाचे चौक याठिकाणी गुलाबाचे पुष्प देवुन जनजागृती करण्यात आली.

(४) रस्ते सुरक्षेबाबत शालेय विद्यार्थ्यांचे शाळेत जावुन निबंध / चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

५) रस्ते सुरक्षेबाबत वाहतुक नियमांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होणेसाठी बोईसर येथील डॉन बॉस्को इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांसोबत पायी रॅलीचे आयोजन करुन नागरीकांमध्ये वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

६) आनंदा आश्रम इंग्लिश मिडियम स्कुल मधील इयत्ता ५ मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी वाहन चालविताना मोबाईलवर न बोलणे, ट्रीपल सिट वाहन न चालविणे, दारु प्राशन करुन वाहन न चालविणे, अॅम्बुलन्स रस्ता देणे, याबाबत वाहतुक नियमांचे पालन करणेबाबत संदेश देणारे पथनाट्य सादर केले. तसेच मुक पटयनाटय सादर केले. आनंदी जीवन कसे जगायचे याबाबत नृत्य सादर केले.

७) “रस्ता सुरक्षा अभियान २०२४ ” सांगता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. राजेंद्र गावित, खासदार, पालघर लोकसभा यांचे सहकार्याने ५०० हेल्मेटचे पालघर येथील सेंट जॉन कॉलेज पालघर तसेच बोईसर मधील थिम कॉलेज, येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच जिल्हयातील इतर दुचाकी वाहन धारक यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

८) पालघर बोईसर शहरातील तीन चाकी रिक्षा, इको, मॅजिक, डमडम इत्यादी वाहन चालकांना सफेद कपडाचे वाटप करण्यात येवुन वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणेबाबत मार्गदर्शन केले.

९) शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा अभियान – २०२४ च्या अनुषंगाने निबंध, चित्रकला तसेच रांगोली इ. घेण्यात आलेल्या स्पर्धेचे अनुषंगाने प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावणा-या विद्यार्थी व विद्यार्थिनीना मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सांगता कार्यक्रमाचे वेळी सर्व उपस्थितांना वाहतुक नियमांबाबत मार्गदर्शन करुन सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट