मारहाण करून मोबाईल चोरणाऱ्या अंबाजोगाई जि.बीड येथील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी ठोकल्या बेडया…

उपसंपादक-रणजित मस्के
लातूर:- याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमध्ये मोटार सायकल वरून येऊन मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 394, 34 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथका कडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोटार सायकल वर येऊन मारहाण करून मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोटर सायकल वर येऊन मोबाईल चोरी करून ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपी निष्पन्न करून, सदर आरोपीस दिनांक 13/02/2024 रोजी दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन नमूद आरोपीला गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले.
1) बालाजी बबन थाटकर, वय 28 वर्ष, राहणार समता नगर, धनगर गल्ली, अंबाजोगाई, जिल्हा बीड.
याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्याच्या आणखीन एक साथीदारासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल दोघांनी चोरल्याचे कबुल केले.
नमूद आरोपीने चोरलेला मुद्देमाल 1 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल असा एकूण 1 लाख 28 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला नमूद गुन्ह्यात अटक करणे कामी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या ताब्यात देण्यात आले आहे.फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाईत पोलीस ठाणे एमआयडीसी येथील एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघड झाला असून मोबाईल चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजीव भोसले, पोलीस अमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे, सायबर सेलचे पोलीस अमलदार शैलेश सुडे, गणेश साठे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com