महिलेवर वारंवार बलात्काराचे व्हिडिओ व्हायरल करून जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी इमरान अंतुले अखेर महाड शहर पोलीसांच्या ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:– सन २०१८ पासून सातत्याने एका महिलेवर बलात्कार करून मोबाइलद्वारे तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून त्या बदल्यात पैसे उकळणाऱ्या एका मुख्य आरोपीसह अन्य चार जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी संबंधित पीडित महिला यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार या महिलेवर सन २०१८ पासून मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आला असून मोबाईलवर संबंधित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये मोबाईल द्वारे प्रसारित करून व इतर अन्य ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या बदल्यात सातत्याने पैशाची मागणी करीत संबंधितांकडून दोन लाख वीस हजार रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी इमरान इब्राहिम अंतुले राहणार चांढवे, महाड ,रायगड, यांच्या सह सनाउल्ला पोरे, अयनान सनाउल्ला पोरे दोघेही राहणार गोरेगाव, माणगाव, मैनुद्दीन हिदायत ढोकले राहणार लाडवली मोहल्ला आणि अकील अफसर फामे राहणार महाड अशा पाच जणांवर
भादवीस कलम, 276,(2)(एन), 342,354(अ)(एक) (दोन), 354 ,354 (ड),384,385 ,506,34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलमं 67(अ )विविध कलमांतर्गत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून सर्व आरोपीना अटक करण्यात आले आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रमेश तडवी साहेब तसेच पोलीस हवालदार श्री. लोळे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट