वैैतरना नदीच्या पुलाखाली एका २५ वर्षीय प्रेताचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोखाडा पोलीस ठाण्याला मोठे यश…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– दिनांक.३/०२/२०२४ रोजी दुपारी 3:00 वाजता मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील वैतरणा नदीवरील पुलाच्या खाली एक अनोळखी २५ ते ३० वयोगटातील इसमाचे प्रेत मिळून आले होते. त्याचे डावे हातावर राणा राजपूत मराठी अक्षरात गोंदलेले, उजव्या हातावर मराठीत आई-बाबा व त्यापुढे लव चे चिन्हामध्ये इंग्रजीत S.D. अक्षर गोंदलेले व अंगठ्याजवळ मराठीत तमन्ना असे अक्षर गोंदलेले त्याचे अंगात गोल गळ्याचा हाफ बाह्याचा छातीवर वरच्या बाजूस सफेद रंगाचा व त्याखाली पिस्ता रंगाचा टी-शर्ट व कळ्या रंगाची फुल पॅन्ट व गळ्यात थंडीसाठी वापरण्यात येणारा सफेद निळ्या जांभळ्या रंगाचा गोल स्काप अशा वर्णनाचे इसमाचे प्रेत मिळून आल्याने सदर बाबत मोखाडा पोलीस ठाणे गुरंन १८/२०२४ भावी कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुनाचा तपास सपोनी / राकेश साखरकर करीत आहेत.

सदर गुन्हा घडल्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तसेच अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार शैलेश काळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर अनिल विभुते, यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखा पालघर व मोखाडा पोलीस ठाणे यांचे संयुक्तरीत्याने मयत व आरोपीताचा ओळखीचा कोणताही पुरावा नसताना मयताची पोउपनि /गणपत सुळे, पोउपनि /वानखेडे, पोउपनि / सावंतदेसाई, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेल्या तांत्रिक तपासाद्वारे ओळख पटवून मयताचे नाव निष्पन्न करून त्याद्वारे अधिक तपास करीत सदरचा गुन्हा आरोपीत नामे

१) पेंटय्या जंगल्या चित्ताऱी वय ३८ वर्षे, रा. इंदिरानगर रूम नं. 3 टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे मूळ रा. तांदुर शहर चंदू महाराज मार्ग ता. तांदूर जि. विकाराबाद राज्य. तेलंगणा

२) साई कुमार इलय्या काडामाछी वय २२वर्षे, रा. इंदिरा नगर रूम न.०३ टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे मूळ रा. लिंगमापल्ली ता. शेरीलिंगपल्ली जि. हैदराबाद शहर राज्य तेलंगणा

३) किशोर जितेंद्र शेट्ये वय २९वर्षे रा. बिर्ला कॉलेजच्या मागे मिलन नगर धर्मवीर शाळेच्या बाजूला चाळीत ता. कल्याण जि. ठाणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने व ते गुन्हा करून हैदराबाद, राज्य तेलंगणा येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाल्याने पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, यांचे आदेशाने सपोनि /अमोल गवळी, पोहवा /४८६ संदीप विठोबा सूर्यवंशी, नेम. स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोहवा /४१२ भगवान आव्हाड, नेम. पालघर पोलीस ठाणे यांनी आरोपींताना हैदराबाद येथून ताब्यात घेऊन मुखडा येथे आणले आहे.

सदर आरोपींना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असताना आरोपीत क्र.१ व २ हे रेल्वेमध्ये पाणी विक्रीचा व्यवसाय करत असून आरोपी क्र.३ हा आरोपी क्र.३ हा आरोपीत क्र. १व २ याचा मित्र आहे. यातील मयत हा आरोपी सोबत रेल्वेत पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करीत असताना त्यांच्याकडून दरमहा पैशाची मागणी करीत असताना आरोपीत क्र.१/३ यांना मारहाण केली होती व घटनेच्या दिवशी देखील पैसे मागण्याकरिता आरोपीच्या घरी टिटवाळा येथे आला असता आरोपी त्यांनी त्यास दारू पाजून मयत यास घरातच लोखंडी पाइपने मारहाण करून आरोपीत क्र.१ ते ३ यांनी बेशुद्ध करून त्यास आरोपीत क्र.१ याच्या मारुती डिझायर या गाडीने खडवली मार्गे कसारा घाटातून खोडाळा रोडवरील कारेगाव शिवारातील वैतरणा नदीच्या पुलावर आणून आरोपीत क्र.२ याने त्यास पाईपने मारहाण करून आरोपीत क्र. याने मयताच्या डोकीवर दगड मारून तसेच आरोपी क्र.३ याने सूर्याने छातीवर,पोटावर जागोजागी वार करून मयत यास वैतरणा नदीच्या पुलावरून १२५ फूट उंचीवरून खाली फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघर अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग शैलेश काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, अनिल विभुते, सपोनि /प्रदीप गिते, प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे, सपोनि / अमोल गवळी पोउपनि /गणपत सुळे, पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा /नरेंद्र पाटील,पोहवा राकेश पाटील, पोहवा / दीपक राऊत, पोहवा / विजय ठाकूर पोहवा / संजय धांगडा, पोहवा / कैलाश पाटील पोहवा / दिनेश गायकवाड, पोहवा / संदीप सूर्यवंशी, पोना / कल्याण केंगार, पोशि / जामदार, पोशि / निकम तसेच स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोहवा /४१२ भगवान आव्हाड, पालघर पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे पालघर येथील पोलिस अंमलदार यांनी उत्कृष्टरित्या पार पडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट