पालघर मध्ये महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना पालघर विभाग तर्फे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण 13 फेब्रुवारी २०२४ पासून विभागीय कार्यालय पालघर विभाग पालघर पूर्व या ठिकाणी एस.टी. कामगारांनी बेमुदत उपोषण धरणे केलं आहे.

विभागीय सचिव पालघर तथा प्रा.सचिव,मुंबई प्रदेश अर्शद चुनेवाला यांनी बेमुदत उपोषण करण्याचे कारण सांगितले की सन 2018 पासून ची महागाई भत्त्याची थकबाकी द्या. तसेच माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोंबर 2021 ची वार्षिक वेतन वाढीसाठी थकबाकी माहे एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी मूळ वेतनात जाहीर केलेल्या रु.5000. रु.4000.व रु.2500 वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करण्यासाठी सरसकट रु.5000.रुपये द्या. रा. प. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना एवढे वेतन मिळण्यासाठी 7 वेतन आयोग लागू करा. सन 2016 / 2020 च्या अनुषंगाने एकतर्फी जाहीर केलेल्या रु.4849/-कोटी मधील शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करा. गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या. शिस्त व अपील कार्यपद्धतीचा भंग करून देण्यात येणाऱ्या नियम बाह्य शिक्षा रद्द करा. वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्ती ऐवजी कॅशलेस योजना ( इंनडोअर /आउटडोअर ) सुरू करा. अपहार प्रवण बदल्या रद्द करा.आयुर्मान संपलेल्या बसेस चलनातून काढून टाका व स्वतःच्या मालकीच्या लालपरी घ्या. चालक-वाहक वेळापत्रकातील ड्युटी दूर करा. 10 ते 12 वर्षापासून TTS वर असलेल्या कर्मचाऱ्यांना TS वर घ्या. सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा. कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना फरक न भरता सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये एक वर्षासाठी मोफत पास देण्याबाबत यावा. सेवानिवृत्ती एसटी कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसह एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये फरक न भरता देण्यात यावा. सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या देय रक्कम तत्काळ द्या. हिट अँड रन चा कायदा रद्द करण्यात यावा. असे अनेक प्रमुख मागण्या एस. टी. कामगारांच्या वतीने विभागीय सचिव, पालघर तथा प्रा. सचिव, मुंबई प्रदेश अर्शद चुनेवाला यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रद्वारे आपले विचार मांडले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट